राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात पार…
मुंबई : लोकसभानिहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली. आज राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्यव्यापी उभे राहणारे संघटन अशा वेगवेगळ्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुढच्या आठवड्यात बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाच्या कामांची व संघटनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक कालबद्ध कार्यक्रम ठेवणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
पुढे तटकरे म्हणाले, लोकसभानिहाय राज्याचा दौरा केला जाणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे करण्याबाबतही चर्चा झाली. याशिवाय राज्यात आमचे ९ मंत्री असून त्यांचा जनता दरबारसुध्दा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पुढच्या आठवड्यात सुरु करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra