conjuctivitis : राज्यात डोळ्यांची साथ जोरात

  183

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा – आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई : राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ (conjunctivitis) या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होवू नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांना आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाईप तयार करून देण्यात आले आहे. ज्या भागामध्ये साथ सुरू झाली आहे. त्या भागातील शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्था व राज्यातील शीघ्र प्रतिसाद पथकाने आळंदी येथील साथीचे अन्वेषण केले आहे. राज्यात 9 ऑगस्ट 2023 पर्यंत 3 लक्ष 57 हजार 265 एकूण रुग्ण आढळले आहेत.



जिल्हानिहाय व महानगर पालिका निहाय रुग्णांची आकडेवारी


सर्वात जास्त 44398 रूग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत. त्यानंतर पुणे 28042, जळगांव 22417, नांदेड 18996, चंद्रपूर 15348, अमरावती 14738, परभणी 14614, अकोला 13787, धुळे 13273, वर्धा 11303, नंदुरबार 10294, भंडारा 10054, वाशिम 9458, यवतमाळ 9441, नांदेड मनपा क्षेत्र 8855, मालेगांव जि. नाशिक मनपा 8655, लातूर 7039, औरंगाबाद 6839, पुणे मनपा 6720, गोंदिया 6532, जालना 6506, पिंपरी चिंचवड मनपा 6010, हिंगोली 5780, नाशिक 5575, अहमदनगर 4992, कोल्हापूर 4702, औरंगाबाद मनपा 4643, नागपूर मनपा 4620, सोलापूर 4282, नाशिक मनपा 3183, नागपूर 3063, मुंबई 2862, गडचिरोली 2796, पालघर 1977, उस्मानाबाद 1910, सांगली मनपा 1848, बीड 1666, सांगली 1540, सातारा 1538, धुळे मनपा 1065, रायगड 816, नवी मुंबई मनपा 790, सिंधुदुर्ग 679, लातूर मनपा 555, चंद्रपूर मनपा 429, ठाणे मनपा 414, सोलापूर मनपा 406, पनवेल मनपा 324, अहमदनगर मनपा 223, रत्नागिरी 222, ठाणे 186, परभणी मनपा 166, अकोला मनपा 151, भिवंडी निजामपूर मनपा 133, वसई विरार मनपा 130, मीरा भाईंदर मनपा 108, कोल्हापूर मनपा 74, कल्याण – डोबिंवली मनपा 58 आणि सर्वात कमी उल्हासनगर मनपा 20 रुग्ण आहेत. अशाप्रकारे 3,57,265 रूग्ण राज्यात आढळले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी