Digital Influencer: दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमधील नवीन खेळाडू!

Share

नेहा जोशी: मुंबई ग्राहक पंचायत

“आरशा, आरशा सांग या जगात सगळ्यात सुंदर कोण?” हा हिमगौरी आणि सात बुटके या गोष्टीतील जादुई आरशाला विचारलेला प्रश्न आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहेच आणि आजही सांग दर्पणा कशी मी दिसते / दिसतो? हा प्रश्न रोज आपण नकळत आरशाला विचारतोच. आपण कसे दिसतो हे कुतूहल आणि त्यातूनच अगदी गोरेपान सुंदर असे नाही तर निदान प्रदर्शनीय किंवा टापटीप आपण दिसावे असे प्रत्येकाला थोड्याफार फरकाने वाटतेच. त्यामुळेच आपण रोज कमीत कमी एखादे तरी सौंदर्य प्रसाधन किंवा त्वचेची, केसांची स्वच्छता राखणारे उत्पादन (ब्युटी अँड पर्सनल केयर प्रॉडक्ट्स) वापरतो.

२०२० मधील कोरोना काळामुळे तर आपण वैयक्तिक स्वच्छतेबद्दल अधिक जागरूक झालो. साहजिकच आपण ही उत्पादने जास्त प्रमाणात वापरू लागलो. कोरोना काळात जागतिक व्यवहार बंद होते त्यामुळे लोकल उत्पादनांना वाव मिळाला. आयुर्वेदिक किंवा ऑरगॅनिक घटक असलेल्या उत्पदनाचा भाव वधारला. नवीन उत्पादक उदयास आले. सर्व व्यवहार घरून होत असल्यामुळे ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल मार्केटिंगने जोम धरला. आजचे जग हे जाहिरातीचे युग म्हणूनच ओळखले जाते आणि जाहिरातदार, उत्पादक आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. त्यासाठी ग्राहकांच्या भावना आणि त्यानुसार असलेली त्यांची मानसिकता हा कळीचा मुद्दा असतो. हीच मेख ओळखून अतिशय चलाखीने उत्पादन ग्राहकाने घ्यावे म्हणून जाहिरातदार जाहिरात करतात आणि भावनेच्या भरात ग्राहक म्हणून आपण त्यास बळी पडतो. हे टाळण्यासाठी या नवीन डिजिटल मार्केटिंग जगताकडे डोळसपणे पाहावयास हवे.

नुकत्याच केल्या गेलेल्या अभ्यासानुसार भारतातील ब्युटी प्रॉडक्ट्सचे मार्केट ६.३% ने २०२७ पर्यंत वाढेल. ज्यामुळे या क्षेत्रात अनेक नवीन उत्पादकांची भर पडेल. साहजिकच या क्षेत्रातील जाहिरातीपण वाढतील. वाढते शहरीकरण, ग्राहकांची वाढलेली क्रयशक्ती, इंटरनेटचा वाढता वापर या सर्व कारणांमुळे उत्पादनांची मागणी वाढत जाणार आहे. या सगळ्यामुळे व्यापाराची पद्धतही बदलते आहे. सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स यांच्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादक ‘डायरेक्ट टू कस्टमर’ या प्रकारे व्यापार करू पाहत आहेत. या सगळ्यात जाहिरात हा कळीचा मुद्दा ठरतो. तो कसा ते पाहू.

वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शन संचावर जाहिरात देण्यासाठी खूप खर्च येतो. साहजिकच नवीन उत्पादकाला ते शक्य नसते त्यामुळे तो इतर सोशल मीडिया साईट्स वापरतो. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब हे त्यातील आघाडीचे खेळाडू. जरा आठवून बघा बरं अलीकडे आपण किती वेळ यू ट्यूबवर घालवतो आणि किती जाहिराती आपसूकच बघतो. होते काय, काही अडले म्हणजे एखादी पाककृती हवी आहे, शेअर मार्केटची माहिती हवी आहे, एखादी कला शिकायची आहे, केशरचना किंवा मेकअप करायचा आहे की आपण यू ट्यूबची मदत घेतो. हळूहळू त्या विषयातील यू ट्यूबरला, ब्लॉगरला आपण अनुसारित करतो, थोडक्यात त्याच्या प्रभावाखाली येतो.

यालाच डिजिटल इन्फ्लुएन्सर असे म्हणतात. हे एक मोठे मार्केट आहे, ज्यात अनेकजण उत्तम पैसे कमावतात. ज्यांचे फॉलोअर्स जास्त त्यांना हे उत्पादक गाठतात आणि त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करावयास सांगतात. तसे हे विश्व नवीन असल्यामुळे अशा प्लॅटफॉर्मवर जाहिरात कमी खर्चात होते, पण उत्पादनाची विश्वासार्हता याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह असते. अनेकवेळा जाहिराती दिशाभूल करणाऱ्या, चुकीचे दावे करणाऱ्या असतात. पण अनेकजण केवळ ते फॉलो करत असलेला इन्फ्लुएन्सर ते उत्पादन वापरण्यास सांगत आहे म्हणून विकत घेतात. पण ते ब्युटी प्रसाधन त्याच्या त्वचेसाठी, केसांसाठी योग्य आहे का? याचा विचार होत नाही आणि फसगत होते. अशाप्रकारे होणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण ४८.८ % इतके आहे आणि ते वाढतच जाणार आहे. त्यामुळे २०२१ साली Advertising Standards Council of India (ASCI)ने इन्फ्लुएन्सरसाठी मागर्दर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ASCI च्या रिपोर्टनुसार गेल्या दोन वर्षांत सौंदर्य प्रसाधनांच्या विरुद्ध येणाऱ्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून या क्षेत्राचा ३ नंबर लागतो. एकूण तक्रारींपैकी २४ % तक्रारी या क्षेत्रातील आहेत. त्यातील ९०.४% जाहिराती या बदलाव्या लागतात त्याचे मुख्य कारण दिशाभूल करणे हे असते. मुख्यत्वे या जाहिराती उत्पादनांची कामगिरी, उत्पादनाच्या केलेल्या टेस्ट्स त्यांचे निष्कर्ष, घटकांची परिमाणकारकता, तज्ज्ञांचे मत, सर्वेक्षण नमूद करत नाहीत. तसेच जाहिराती दावा करतात की त्यांचे उत्पादन ऑरगॅनिक किंवा नॅचरल आहे पण प्रत्यक्षात सिन्थेटिक घटक जास्त असतात ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ममा अर्थ’ कंपनीची ओनियन शाम्पूची जाहीरातीमधून नॅचरल हा शब्द काढावा लागला. काही वेळा जाहिरातींमध्ये ते उत्पादन नंबर १ असल्याचे किंवा अतिशयोक्तीचे दावे केलेले असतात.

जानेवारी २०२३ मध्ये या सगळ्यांची दखल घेत Advertising Standards Council of India (ASCI)च्या मागर्दर्शक तत्त्वांबरोबरच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने इन्फ्लुएन्सर्सना सर्व माहिती, पेड प्रोमोशन असे स्पष्ट प्रगटीकरण करणे बंधनकारक केले आहे तसे न केल्यास ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) निर्माते, जाहिरातदार आणि अनुमोदक यांना १० लाख रुपयांपर्यंत दंड करू शकते. त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

प्रकटीकरण/खुलासे हे सोप्या आणि स्पष्ट भाषेत असले पाहिजेत, अशा कालावधीत असावेत जे सहज लक्षात येतील. लाइव्ह स्ट्रीमही समर्थनांसह चालवले जाणे आवश्यक आहे. प्रकटीकरण हॅशटॅग किंवा लिंक्सच्या गटामध्ये मिसळले जाऊ नये. एखाद्या चित्राच्या अनुमोदनामध्ये, दर्शकांच्या लक्षात येण्याइतपत प्रकटीकरण प्रतिमेच्या वर लावले जावे. व्हीडिओमध्ये, खुलासे केवळ वर्णनात न ठेवता व्हिडिओमध्ये ठेवले पाहिजेत आणि ते ऑडिओ आणि व्हीडिओ दोन्ही स्वरूपात केले जावेत. थोडक्यात ‘पी हळद आणि हो गोरी’ असे कधीच होत नसते हे मर्म लक्षात घेऊन ग्राहकांनी अधिक सजग असावे हेच खरे !

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…

14 mins ago

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

31 mins ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

2 hours ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

2 hours ago

Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…

4 hours ago

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

13 hours ago