मुंबई : गेल्या अनेक महिन्यांनंतर कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णाचा मृत्यू जुलैमध्ये झाला होता, परंतु अधिकृत नोंदींमध्ये आता समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. या रुग्णाला ओमायक्रॉनच्या (Omicron) सब व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मृत व्यक्ती ७५ वर्षीय मुंबईतील रहिवासी असून त्याला यकृताचा कर्करोग झाला होता. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असली तरी हा व्हायरल त्याच्या प्राथमिक मृत्यूसाठी जबाबदार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुंबईत १० नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यामधील ही दुसरी वेळ आहे की शहरात कोविड प्रकरणे दोन आकडी नोंदली गेली आहेत; यापूर्वी ही नोंद ६ ऑगस्ट रोजी झाली होती.
रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून चिंतेचे कोणतेही कारण नाही. आज आणखी चार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईत ४७ सक्रिय रुग्ण आहेत.
काही नमुन्यांमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन उप-प्रकार, EG.5.1 मुळे महाराष्ट्रात कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे संकेत असले तरी, आरोग्य तज्ञांनी तात्काळ चिंतेचे कारण नाही असे स्पष्ट केले आहे. या उप-प्रकाराचा शोध लागल्यापासून कोणतीही लक्षणीय वाढ दिसून आलेली नाही.
राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की नवीन उप-प्रकारांमुळे प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या गोष्टीला काही पुरावा नाही. यावर अधिक अभ्यास करण्यासाठी येत्या आठवड्यात परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले जाईल. कारण सर्व श्वसन संक्रमण सामान्यत: जून ते सप्टेंबर दरम्यान वाढलेले दिसून येते.
दरम्यान, राज्यातील १६ टक्के कुटुंबात संसर्गजन्य किंवा कोव्हिडसारखी लक्षणे आढळत आहेत. केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यात वायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एका राष्ट्रीय सर्व्हेक्षणात असे आढळले आहे की, अनेक घरांमध्ये एकापेक्षा जास्त सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, लक्षणे रुग्णालयात भरती करण्याइतकी गंभीर नसल्याचे देखील आढळून आले आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…