रोनाल्डो प्रति इन्स्टाग्राम पोस्टमधून ३.२३ अमेरिकन डॉलर कमावतो. फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. रोनाल्डो हा सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती ठरला आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, रोनाल्डो प्रति इन्स्टाग्राम पोस्टमधून ३.२३ अमेरिकन डॉलर कमावतो. ही मोठी रक्कम मिळण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर या दिग्गजाचे जवळपास ६०० दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. यादीतील त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेला अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी सुमारे २.६ दशलक्ष कमावतो.
इन्स्टाग्रामवर विराट एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीयांसह आशियाई व्यक्तींच्या यादीत स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या स्थानी आहे. विराटला एका पोस्टमधून ११.४० कोटी रुपये मिळतात. तर जगभरातील खेळाडूंमध्ये त्याचा क्रमांक तिसरा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराट एका इंस्टाग्राम पोस्टवरून जवळपास ११.४५ कोटी रुपये कमावतो. इन्स्टाग्रामवर कोहलीचे २५.६ कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सार्वत्रिक यादी पाहता विराट कोहलीचा १४वा क्रमांक आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा तो पहिला आशियाई आहे. आशियातील इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेल्या लोकांच्या यादीत इस्रायलची अभिनेत्री गॅल गॅडोट १०३ दशलक्षसह दुसऱ्या स्थानावर आहे. थायलंडची संगीतकार लिसा ९४ दशलक्षसह तिसऱ्या स्थानावर आहे.