बदलती क्रीडा संस्कृती : मैदान ते टर्फ

Share

स्ट्रेट ड्राइव्ह: ज्योत्स्ना कोट-बाबडे

भली मोठी लाल मातीची मैदाने उघड्या पायांनी तुडवत, त्यात डोक्यावरचे कडक ऊन झेलत, घामाने चिंब झालेल्या मुलांचा क्रिकेटचा रंगलेला सामना असो किंवा पावसाळ्यात मजा म्हणून समुद्रकिनाऱ्यांवर फुटबॉल, हॉकीचा आनंद घेणारी मुलं-मुली आणि मातीचे डाग अंगावर मिरवत मैदानी खेळ खेळणारी शाळकरी पोरं वा कॉलेजकुमार, ही आजवरची क्रीडा संस्कृती. या प्रचलित नैसर्गिक मातीच्या मैदानांपलीकडे अलीकडच्या काही वर्षांत टर्फ संस्कृतीने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. इमारतीकरणात मैदानांचा घसा आवळून ती आकसायला लागली आहेत. त्याबरोबर ही टर्फची मैदाने तरुणांना आकर्षित करत आहेत. ट्रेनमधून येता-जाता अशी मैदाने नजरेस पडतात, तेव्हा विचार येतो, भविष्यात सेवा देणारे शहर अशी ख्याती मिरवणारी मुंबई आणि त्या लगतच्या उपनगरीय शहरांत क्रीडा संस्कृती स्थित्यंतरातून तर जात नाही ना?

मातीच्या मैदानांसह टर्फही गजबजू लागले आहेत. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी टर्फ ही मैदान संस्कृती सोयीची ठरत आहे. ऑफिसेसमधील डिपार्टमेंट मॅचेससाठी टर्फ उत्तम पर्याय ठरत आहे. जमिनीलगत गवताची चादर, सोयीनुसार कमी-अधिक आकाराचे, चारही बाजूंनी नेटने झाकोळलेले अशा मिनी मैदानाला टर्फ असे म्हटले जाते. या टर्फमध्ये जवळपास रात्री ११ वाजेपर्यंत खेळण्याची सोय असते. त्यामुळे ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी काम संपवून खेळणे सोयीस्कर ठरते. या मैदानाबाहेर बॉल जाण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या छोटेखानी; परंतु आकर्षक अशा मैदानात वेगळीच मजा असते. येथे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, रग्बी असे आवडीनुसार खेळ खेळले जातात. विविध क्लब किंवा इंग्रजी शाळांच्या लगत अवतीभवती झाडांनी वेढलेल्या हिरव्यागार वातावरणात ही टर्फची मिनी आकर्षक मैदाने लक्ष वेधून घेतात. खासगी कार्यालयांतर्गत कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांसाठी टर्फ हा उत्तम पर्याय आहे. अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांकडून असे टर्फ दिवसभरासाठी बुक करून त्यात विविध खेळ खेळले जातात. त्यात महिलाही सहभागी होतात.

दुसरीकडे कबड्डीसारख्या मैदानी खेळात हल्ली सर्रास मॅटचा वापर होतो. पूर्वी केवळ मातीत बॉडी आणि शॉट्सवर खेळला जाणारा हा गरिबांचा खेळ आता चकचकीत शूज घालून मॅटवर खेळला जात आहे. कबड्डीच नाही, तर फुटबॉलसारखा मैदानी खेळही मॅटवर खेळला जात आहे. क्रीडा संस्कृती स्थित्यंतरातून जात असल्याचा हा दाखला आहे. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल हे खेळ आता फक्त मातीच्या मैदानांपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते टर्फ ते मॅटच्या खेळपट्टीवर खेळले जात आहेत.
टर्फच्या खेळपट्ट्या स्वस्त आणि मस्त असल्या तरी त्या हौशी लोकांसाठी जास्त उपयुक्त आहेत. पण प्रोफेशनल क्रिकेट खेळू पाहणाऱ्या मुला-मुलींनी ते टाळलेलेच बरे. पण जर एखाद्याला उत्तम खेळाडू म्हणून घडायचे असेल, तर त्याने जास्तीत जास्त प्रॅक्टिस टर्फ पिचपेक्षा मातीच्या अर्थात सॉइल (soil) पिचवरच करावी. कारण, टर्फवर चेंडू जास्त उसळी घेतो. बॅटवर लगेच येतो. त्यामुळे खेळायला मजा येत असली तरी प्रत्यक्षात जेव्हा स्पर्धा होतात, तेव्हा त्यामुळे फ्रंट फूटवर खेळणे त्यांना अवघड जाते. कारण त्याची प्रॅक्टिस टर्फवर होतच नाही.

या टर्फबद्दल आणि एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी झाल्यास पावसाळ्यात अशा पिचवर खेळणे फायद्याचे ठरते. कारण मुलांच्या खेळावर परिणाम होत नाही. त्यांचा सराव थांबत नाही. मातीची खेळपट्टी उपलब्ध नसल्यास पावसाळ्यापुरते या खेळपट्टीवर खेळण्यास हरकत नाही; परंतु पावसाळ्यासाठी टर्फप्रमाणे सॉइल म्हणजे मातीचे पिच बनवून घेता येतात. पण टर्फच्या तुलनेत सॉइल पिचेसचा मेंटेनन्स खूप असतो. म्हणून क्लब असो वा शाळा वगैरे या संस्थाही टर्फची पिच वापरणे जास्त सोयीचे समजतात. कारण खर्च कमी आणि सांभाळायला पण सोपी. टर्फचे मैदान एक झाडू मारला की झाले पूर्वीसारखे; परंतु मातीच्या खेळपट्टीचा मेंटेनन्स जास्त. त्यामुळे खासकरून पावसाळ्यासाठी क्वचितच मातीच्या खेळपट्ट्या बनवून घेतल्या जातात. कल्याणमध्ये पावसाळ्यासाठी एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात अशी मातीची पिच उपलब्ध आहे आणि त्यानंतर ठाणे, मुंबई अशा ठिकाणी येथील मुलांना जावे लागते. त्यामुळे लांब कुठे जाण्यापेक्षा जवळचे टर्फ बरे अशी अवस्था आहे. मुंबई असो किंवा लगतची शहरे या ठिकठिकाणी तुलनेने स्वस्त टर्फचा वाढता वापर याला कारणीभूत आहे.

क्रिकेट असो वा फुटबॉल, रग्बी आणि हॉकी या सर्व मैदानी खेळांमध्ये टर्फ आणि नैसर्गिक मातीच्या खेळपट्टीचे फायदे आणि तोटे दिसतात. ते असे की, गवताच्या खेळपट्ट्या नैसर्गिक गवताने बनलेल्या असतात, जे कृत्रिम टर्फपेक्षा मऊ पृष्ठभाग प्रदान करतात. यामुळे दुखापतीचा धोका कमी होऊ शकतो, विशेषत: रग्बी आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये. याउलट कृत्रिम टर्फ नैसर्गिक गवतापेक्षा कठीण आणि कमी मऊ असू शकते, ज्यामुळे इजा होण्याचा धोका जास्त असतो. तसेच गवताच्या खेळपट्ट्या सामान्यत: कृत्रिम टर्फपेक्षा अधिक चांगले कर्षण प्रदान करतात, ज्यामुळे खेळाडू लवकर आणि अधिक सहजतेने दिशा बदलू शकतात. शिवाय गवताच्या खेळपट्ट्या कृत्रिम टर्फपेक्षा थंड असतात, ज्या विशेषतः उष्ण हवामानात फायदेशीर ठरू शकतात. त्याउलट ऊबदार हवामानात कृत्रिम टर्फ खूप गरम होऊ शकते.

गवताच्या खेळपट्टीवर खेळण्याचे तोटे असे की, त्या हवामानावर अवलंबून असतात. ओल्या हवामानात या मातीच्या खेळपट्ट्या चिखलाच्या आणि न खेळण्यायोग्य होऊ शकतात, ज्यामुळे सामने रद्द किंवा पुढे ढकलले जाऊ शकतात. पण याउलट कृत्रिम टर्फच्या खेळपट्ट्या कोणत्याही हवामानात वापरल्या जाऊ शकतात. ज्यामुळे त्या भरपूर पाऊस किंवा बर्फ असलेल्या ठिकाणांसाठी आदर्श ठरतात. गवताच्या खेळपट्ट्यांना चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी नियमित देखभाल करणे आवश्यक आहे, जसे की पेरणी, पाणी देणे आणि खत देणे. तसेच गवताच्या खेळपट्ट्या कालांतराने असमान होऊ शकतात, ज्यामुळे चेंडू उसळू शकतो किंवा अप्रत्यशितपणे रोल करू शकतो. पण कृत्रिम टर्फ खेळपट्ट्या गवताच्या खेळपट्ट्यांपेक्षा जास्त टिकाऊ असतात पण त्यावर चेंडू नैसर्गिक गवतापेक्षा कृत्रिम टर्फवर जास्त उसळू शकतो, ज्यामुळे तो नियंत्रित करणे कठीण होऊ शकते.

एकूणच, गवत किंवा कृत्रिम टर्फ खेळपट्टीवर खेळण्याची निवड जिथे खेळ खेळला जात आहे ते ठिकाण, हवामानाची परिस्थिती आणि खेळाडू आणि संघांच्या विशिष्ट गरजा अशा विविध घटकांवर अवलंबून असते. शाळा, कॉलेजेस किंवा क्लब ज्यांचे बजेट कमी असते ते टर्फच्या पिचेसना प्राधान्य देतात कारण त्यावर होणारा कमी खर्च. हे सर्व पाहता कृत्रिम खेळपट्ट्या काही अंशी फायदेशीर असल्या तरी नैसर्गिक मातीच्या गवतावर खेळण्याचा जो आनंद आहे तो टर्फवर मुळीच येऊ शकत नाही. हळूहळू मातीची जागा कृत्रिम टर्फ अर्थात प्लास्टिकने व्यापत चालले असले तरी व्यावसायिक स्तरावर मातीला तोड नाही, हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही. हौशी कलावंत अर्थात मौज म्हणून खेळणाऱ्या लोकांसाठी टर्फ हा चांगला पर्याय आहे. या टर्फमुळे खेळताना घाम गाळून चिंब भिजलेली मुले घरी येण्याचे आणि त्यांचे मळलेले कपडे पाहून आईचा ओरडा खाण्याचे प्रकार अलीकडे कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

टर्फवरसुद्धा खेळाडू घडतात, घडतील यात शंका नाही, पण त्यात फरक असेल. या बदलत्या क्रीडा संस्कृतीमुळे क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल हे खेळ आता फक्त मातीच्या मैदानांपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते कृत्रिम टर्फ ते मॅटच्या खेळपट्टीवर खेळले जात आहेत. मैदानी खेळांमध्ये होत असलेली ही क्रांती आहे. शिवाय आजकालचे तरुणही अशा चकचकीत, सोयीस्कर वाटणाऱ्या टर्फ, मॅटकडे आकर्षित होत आहेत. ही बदलती क्रीडा संस्कृती त्यांच्या पसंतीला उतरत आहे.

jyotsnakot@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

1 hour ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

1 hour ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

2 hours ago

Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…

2 hours ago

Pune Crime : पैसे परत न केल्याने शिक्षित डॉक्टरने कोयता हाती घेत केला तरुणाचा खून!

गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…

4 hours ago

Pune porsche accident : अखेर धनिकपुत्राने लिहिला ३०० शब्दांचा निबंध!

बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…

5 hours ago