World cup 2023: विश्वचषक स्पर्धेत खेळणार दिनेश कार्तिक?

Share

आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडू दिनेश कार्तिक समालोचक म्हणून दिसू शकतो.

कार्तिकने स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली.एका चाहत्याने ट्वीट करून कार्तिकला प्रश्न विचारला की, आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा विकेटकीपर कोण असेल?” यावर दिनेश कार्तिकने प्रत्युत्तर दिले. फॅन्सच्या ट्वीटला उत्तर देत कार्तिकने आणखी एक ट्वीट केले आहे. त्याने लिहिले की, “तुम्ही मला विश्वचषकात नक्कीच पाहाल पण ते सर्व बीसीसीआयच्या हातात आहे, अजून काय सांगू…” यासोबतच कार्तिकने एक लक्षवेधी इमोजीही टाकला आहे. या ट्वीटमध्ये त्याने म्हटले आहे की, विश्वचषकात तो खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचक म्हणून नक्कीच पाहायला मिळेल. नुकत्याच झालेल्या अॅशेसमध्ये कार्तिक समालोचन करताना दिसला होता.

५ ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत १० संघ खेळणार आहेत. एकूण ४८ सामने भारतातील विविध १० ठिकाणी खेळवले जातील. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ नोव्हेंबरला पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्येच होणार आहे. भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…

3 hours ago

जनहितैषी अर्थसंकल्प!

ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…

6 hours ago

एनडीए सरकारचा नवा संकल्प हवा

रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…

6 hours ago

एनटीएच्या अक्षम्य घोडचुका…

हरीश बुटले, करिअर सल्लागार पेपरफुटी किंवा सॉल्व्हर गँग हे समाजकंटक आणि नतद्रष्ट लोकांचे काम आहे…

7 hours ago

पैसाच पैसा, टी-२० वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल, रनर-अप संघावरही कोट्यावधींचा पाऊस

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण…

9 hours ago

Jio आणि Airtel युजर्स स्वस्तामध्ये करू शकता रिचार्ज, २ जुलैपर्यंत आहे संधी

मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स…

10 hours ago