
खड्ड्यांमुळे त्रस्त लोकांनी उचलले 'हे' पाऊल...
पेण : मागील तेरा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) रखडलेले काम होत नसून या महामार्गावर महाकाय असे खड्डे देखील पडले आहेत. मात्र शासनाने या महामार्गाकडे आणि खड्ड्यांकडे लक्ष दिलेले नाही. याउलट खड्डे भरण्यासाठी पैसेच नसल्याचे राज्य सरकारने (State Government) सांगितल्याने आता आपणच रस्त्यावर उतरून भीक दो आंदोलन करणार आहोत, असे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, सोबती संस्थेचे मंगेश नेने यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. रविवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाशी नाका, पेण येथे हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने खड्डे भरायला पैसे नसल्याचे सांगितल्याने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, पेण पत्रकार आणि सोबती संस्थेने या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यावेळी ते रस्त्यावर उतरून खड्डे भरण्यासाठी 'भीक दो' असं आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी आणि वाहन चालकांनी सहभागी व्हावे तसेच जास्तीत जास्त प्रवाशांनी हे खड्डे भरण्यासाठी चिल्लर स्वरूपात भीक द्यावी असे आवाहन समीर म्हात्रे यांनी केले आहे.
भीकेच्या स्वरूपात सदर जमा झालेली रक्कम एकत्र करून ती प्रशासनाच्या ताब्यात देऊन ती शासनाकडे पाठविण्याची विनंती करणार असल्याचे देखील यावेळी समीर म्हात्रे, मंगेश नेने यांनी सांगितले. यावेळी सदर आंदोलना बाबत तहसील कार्यालयात निवेदन देखील देण्यात आले आहे.
खुशी August 12, 2023 07:50 AM
फक्त रायगड जिल्ह्यातील रस्ते बनविण्यासाठी पैसे नाहीत बाकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते पूर्ण झाले आहेत, समृध्दी महामार्ग पुर्ण झाला याचा अर्थ निवडून दिलेले प्रतिनिधी कामाचे राहिले नाहीत . त्यांना नारळ द्यायची वेळ आलेली आहे 😡😡😡
Rajendra Salvi August 11, 2023 04:07 PM
खोके द्या...मग काम होईल..
Rohan Chorghe August 11, 2023 10:28 AM
मला एक कळत नाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते कसे पूर्ण झाले आणि फक्त रायगड जिल्ह्यातील कसे अपूर्ण राहिलेत. याचा अर्थ एकच , रायगड जिल्ह्यात निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काहीच कामे करत नाही यावरून दिसते , त्यांनी जर मंत्रालयात जोर धरला तर ही कामे लवकर होतील. असे मला वाटते. कालच हा त्रास मी उपभोगला आहे हाडे नुसती खिळखिळी झालीत , मी एका दिवसाच्या प्रवासात त्रासलो तर नेहमी प्रवास करणाऱ्यांची हालत काय असेल हे ह्या वरून समजते. तसेच रस्ता वाढणी मध्ये घरे येणाऱ्यांनी सुद्धा तेवढाच सहकार्य करणे गरजेचे आहे.