मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) ‘फ्लाइंग किस’चा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या कृतीविरोधात महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही राहुल गांधींवर सडकून टीका केली. त्यांनी राहुल यांना ‘रोडरोमिओ’ संबोधून ‘मां का लाडला बिगड गया’, अशी टीका केली.
चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या आहेत की, संसदेच्या पवित्र भूमीवर राहुल गांधींनी फ्लाइंग किस केल्याची कृती ही निंदणीय आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने असे वर्तन करणे हे अशोभणीय आहे. चौकीदार चोर आहे, या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना कोर्टात लिखित स्वरुपात माफी मागावी लागली होती. अलीकडेच मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांची खासदारकी रद्द झाली होती. खासदारकी त्यांना परत मिळाली. मात्र राहुलजींची वृत्ती बदलली नाही.
चित्रा वाघ म्हणाल्या, आज संसदेत मणिपूरच्या महिलांना न्याय आणि आदर देण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर त्यांनी केलेली कृती महिला विरोधी आहे. काँग्रेस नेते महिलांच्या सन्मानाची गोष्ट केवळ आपल्या भाषणातच करतात. त्यांची वृत्ती महिला विरोधी आहे, हे आज दिसले. असे रोडरोमिओ भारत जोडो यात्रा काढत आहेत. काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. देशातील सर्वोच्च पदावर बसण्याची स्वप्न पाहात आहेत. मात्र, जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे वाघ म्हणाल्या.
यावेळी त्यांनी सोनिया गांधींना निवेदन केले. त्या म्हणाल्या, सोनियाजी, लवकरात लवकर राहुल यांचे लग्न करा. त्याचे मानसिक संतुलन बिघडलेय. मा का लाडला बिगड गया, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…