
आशिया कपमध्ये भारताच्या जर्सीवर येणार पाकिस्तानचे नाव...
आगामी आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या जर्सीवर पहिल्यांदाच पाकिस्तानचे नाव छापले जाणार आहे. आशिया कपच्या लोगोखाली यजमान संघाचे नाव असते. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे.
आशिया चषक २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना २०२३ च्या हंगामासाठी त्यांच्या जर्सीवर आशिया कपचा लोगो लावावा लागेल. त्याचबरोबर लोगोच्या खाली यजमान संघाचे नाव असणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवरही पाकिस्तानचे नाव लिहिले जाईल.
आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. सर्व संघांची ३-३ अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळला गट-अ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, ज्यामध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर-४ स्टेजचा समावेश असेल.