Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Modi live: घमंडिया आघाडीवर मोदींचा हल्लाबोल....

Modi live: घमंडिया आघाडीवर मोदींचा हल्लाबोल....

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'तुम्हाला फक्त सत्तेची चिंता आहे, पण देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर वारंवार विश्वास दाखवला आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली.


पीएम मोदी यावेळी म्हणाले, 'आज सर्व विरोधक एकत्र आले आहेत. त्यांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, सत्तेची भूक डोक्यात आहे. देशातील युवकांच्या भविष्याची पर्वा नाही, स्वतःच्या राजकीय भविष्याची चिंता आहे. या अधिवेशनात ते आले फक्त अविश्वास प्रस्तावासाठी, पण कोणतीही तयारी न करता बोलत आहेत.


काँग्रेसच्या नो बॅालवर, भाजपाची सेंचुरी.....


'तुम्ही तयारी करुन का येत नाही? फिल्डिंग तुम्ही लावली होती, पण चौके-छक्के आम्ही लगावले. मी 2018 मध्येच सांगितलं होतं की, पुढच्यावेळी तयारी करुन या. तुम्ही काहीच तयारी करुन आला नाहीत. तुमची काय अवस्था झाली, देश तुम्हाला पाहतोय. तुमच्या एक-एक शब्दाला देश ऐकतोय. तुम्ही प्रत्येकवेळी देशाची निराशाच केली आहे. ज्यांचे स्वतःचे 'वहीखाते' बिघडलेले आहेत, ते आम्हाला आमचा हिशोब मागत आहेत,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.


मोदी पुढे म्हणाले, 'या अविश्वास प्रस्तावात काही विचित्र गोष्टी पाहण्यात आल्या. सर्वात मोठ्या विरोधी नेत्यांचे बोलणाऱ्यांच्या यादीत नाव नव्हते. मागचे उदाहरण पाहा, 1999 अटलजींच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता, तेव्हा शरद पवारांनी विरोधकांचे नेतृत्व केले होते. 2003 मध्येही अटलजींचे सरकार होते, तेव्हा सोनिया गांधी यांनी नेतृत्व केले होते. 2018 मध्ये खर्गे यांनी नेतृत्व केले, पण यावेळेस अधीर रंजन यांची काय अवस्था झाली. त्यांच्याच पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. आज त्यांना परत एकदा बोलण्याची संधी दिली होती, पण त्यांनी 'गुड का गोबर' केला, यात ते माहीर आहेत.'


काँग्रेस दरवेळेस अधीर रंजन यांचा अपमान करतात. तरीही कोलकत्ताहुन आलेल्या दबावामुळे त्यांंना काँग्रेसचे नेतृत्व मिळाले आहे. अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.२०२४ मध्ये देखील भाजपा खूप मोठ्या जनादेशाने पुन्हा सत्तेत येईल. आणि पहिल्या ५ च्या यादीतील भारत पहिल्या ३ मध्ये असेल. असे आश्वासन मोदींनी दिले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments

सदाशिव उर्फ बापू वैऊ    August 10, 2023 07:30 PM

अविश्वास ठरवामुळे कोण कुठं आहे समजलं.काॅग्रेसच्यावेळी महागाई थोडीजरी वाढली,गॅस चे भाव वाढले तर अंदोलन करत आत्ता चे सत्ताधारी करत पण आज ते एकप्रकारे समर्थन करत आहेत.काय म्हणावे

Add Comment