Thursday, May 8, 2025

विदेशताज्या घडामोडी

Joe Biden received threat call : जो बायडन यांना जीवे मारण्याची धमकी; FBI ने आरोपीला पाठवले थेट यमसदनी

Joe Biden received threat call : जो बायडन यांना जीवे मारण्याची धमकी; FBI ने आरोपीला पाठवले थेट यमसदनी

कोण आहे हा आरोपी?


वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) हे सध्या पश्चिम अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. ते बुधवारी न्यू मॅक्सिको (New Mexico) येथे गेले होते, त्यानंतर त्यांचे यूटा (Utah) येथे येण्याचे नियोजन होते. दरम्यान त्यांच्या येण्याची बातमी कळताच क्रेग डिवीयू रॉबर्टसन (Craig Deleeuw Robertson) या व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकीवजा पोस्ट टाकली. मात्र, बायडेन हे यूटा राज्यात जाण्यापूर्वीच धमकी देणाऱ्या आरोपीला एफबीआयने ठार केलं आहे.


फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) संस्थेकडून सांगण्यात आलं की, एफबीआचे विशेष प्रतिनिधी सॉल्ट लेक सिटीच्या दक्षिणेमध्ये असलेल्या प्रोवोमध्ये क्रेग डिवीयू रॉबर्टसन याच्या घरी वॉरंट घेऊन पोहोचले होते. या दरम्यान, सकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी गोळीबार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार क्रेह डिवीयू रॉबर्टसन याच्याकडे शस्त्रास्त्रे होती. गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.



रॉबर्टसनच्या पोस्टमध्ये काय म्हटले होते?


रॉबर्टसनने सोमवारी एक पोस्ट करुन म्हटलं होतं की, बायडन यूटा येथे येत असल्याचं ऐकलं आहे. मी इकडे एम२४ स्नायपर रायफलवरील धूळ साफ करत आहे. त्यांनी इथे यावेच. रॉबर्टसन याच्या पोस्टमुळे एफबीआय सतर्क झाली. त्यांनी रॉबर्टसन याच्या घरी छापा टाकण्याचे ठरवले. त्यानंतर सकाळच्या सुमारास रॉबर्टसन ठार झाल्याचं जाहीर करण्यात आलं. एफबीआयने यासंदर्भात अधिक माहिती देण्याचं टाळलं आहे.



अनेक दिवसांपासून एफबीआयचे होते लक्ष


रॉबर्टसनने आपल्या एका पोस्टमध्ये स्वत:ला 'एमएजीए ट्रम्पर' म्हटलं आहे. हे नाव माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' घोषणेच्या संदर्भात आहे. रॉबर्टसनने याआधीही अनेकवेळा वादग्रस्त पोस्ट केल्या आहेत. २०२२ मध्ये केलेल्या एका पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की एका अध्यक्षाची हत्या करण्याची ही योग्य वेळ आहे. अगोदर जो बायडन आणि त्यानंतर कमला. रॉबर्टसन डोनाल्ड ट्रम्प यांचा चाहता असल्याचं सांगितलं जात. ट्रम्प यांच्याविरोधात कोर्टात लढणाऱ्या वकीलाला त्याने जीव मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे एफबीआय त्याच्यावर लक्ष ठेवून होती. अखेर त्याला ठार मारण्यात यश आलंय.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment