तळोजातील रस्त्यांची दुरुस्ती पावसाळा संपल्यावर

रहिवाशांच्या तक्रारीची सिडकोने घेतली दखल


नवी मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे सिडकोच्या वतीने तळोजा फेज - १/२ मधील डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवरील डांबराच्या थराची झालेली झीज आणि महानगर गॅस कंपनी व विद्युत विभागाकडून, रस्त्यांचे करण्यात आलेले खोदकाम नव्याने दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता (तळोजा) मिलिंद म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.


सिडकोकडून पावसाळ्यापूर्वी तळोजा फेज -१/२ मधील रस्त्यांचे डांबरीकरण पावसात वाहून गेले त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दुरुस्ती आणि रस्त्यांचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मे. पी.पी. खारपाटील यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पंचनंद नगर रहिवाशी सामजिक संस्थेचे अध्यक्ष कासम मुलाणी यांनी केली होती. सिडकोकडून तळोजा फेज -१ मधील ९६,९०० वर्ग मीटर रस्त्यांचे डांबरीकरण तसेच फेज -२ मधील ९२,७०० वर्ग मीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम मे. पी.पी. खारपाटील कन्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. ऑक्टोबर -२०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे.


सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस जून महिन्यात तळोजा परीसरात १,४३३ मिमी. पडल्याची नोंद झाली आहे. या पावसात फेज- १ मधील एकूण डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यापैकी १ टक्का आणि फेज -२ एकूण कामांपैकी २.७५ टक्के रस्त्याच्या पृष्ठ भागाची (डांबराच्या ३० मिमी. थर) झीज झाल्याचे आढळून आले. तसेच महानगर गॅस कंपनीचे पाइप लाइन टाकण्याचे काम आणि विद्युत विभागाकडून गृहनिर्माण प्रकल्पातील विद्युत केबल टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर तत्काळ नव्याने दुरूस्ती करण्यात आली. परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोषदायित्व कालावधी ३ वर्षाचा असल्याने पाऊस कमी झाल्यानंतर तत्काळ रस्त्यांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल असे, मिलिंद म्हात्रे यांनी मुलाणी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड

Ahilyanagar : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना 65 जण रंगेहाथ ताब्यात; पोलिसांच्या कारवाईने परिसरात खळबळ

Ahilyanagar : जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी (Ahilyanagar Police) मोठी धडक

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची

Nashik : देशातील 12'हीट रेसिलियंट सिटीज'मध्ये नाशिकचा समावेश, शहरासाठी पाच कोटींचा विकास आराखडा

Nashik : काँक्रिटीकरणाचा वेग आणि हवामानातील सातत्याने होणार बदल यामुळे निर्माण होणाऱ्या 'अर्बन हीट आयलंड'च्या

Jalgaon : वारीच्या आनंदावर शोककळा, ट्रॅक्टर अपघातात एक ठार तर १५ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Jalgaon : सोमवारपासून महाराष्ट्रात वारीचा उत्साह पहायला मिळतोय. अनेक ठिकाणाहून सोमवारी पंढरपूरच्या दिशेने

Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक