
नवी दिल्ली: भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस देत हा महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा महिला खासदारांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीच स्मृती ईराणी यांनी केली आहे. २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे धाव घेऊन तक्रारही केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. खासकरून मणिपूरच्या हिंसेच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरलं. त्यानंतर मंत्री स्मृती ईराणी या भाषणाला उभ्या राहिल्या. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला. स्मृती ईराणी बोलत असताना राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले.