Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणनितीन गडकरींनी पराभव मान्य केला पण उदय सामंत यांनी घेतली शपथ

नितीन गडकरींनी पराभव मान्य केला पण उदय सामंत यांनी घेतली शपथ

पुढच्या एका वर्षात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्याचा विडा उचलला

अलिबाग : देशभरात रस्ते बांधकामात नावाजलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: आपण कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेकदा प्रयत्न करुनही पूर्ण करु शकलो नाही, याची खंत जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा रखडलेला विकास पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनभावनांचा आदर करीत महामार्ग एका वर्षात पूर्ण करण्याबाबत शपथ घेतली आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णतेसाठी सातत्याने वेगवेगळ्या संस्थाकडून आंदोलन व मागण्या होत आहेत. तसेच कोकणातील पत्रकारांनी आज वाकण येथे बोंबाबोंब आंदोलन करून निषेधाचे दहा हजार संदेश पाठविण्याचे नियोजन केले आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार, अन्य संघटना आणि कोकणवासियांच्या भावना समजून घेत या महामार्गाच्या बांधकामासाठी स्वतः कटिबद्ध असल्याचे आश्वस्त करताना पत्रकारांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत आंदोलनकर्त्यांच्या, आपल्या सर्वांच्या भावना व कोकणवासीयांच्या भावना याच माझ्या देखील भावना आहेत. आपला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात विभागला आहे. मी पालकमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा महामार्ग पूर्ण झाला आणि तसाच माझा प्रयत्न रायगड आणि रत्नागिरीसाठी आहे. काही ठेकेदारांच्या तांत्रिक अडचणीमध्ये हायवे अडकला आहे. मी स्वतः केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. तरीही अपयश येतेय, याची मला कल्पना आहे. पण मी आपणास शब्द देतो की, पुढच्या एका वर्षात काहीही करून हा हायवे पूर्ण करू करण्याची मी खात्री देतो.

तुमच्या भावनांचा आदर करून मी शपथ घेतो की, पुढच्या एका वर्षात हा हायवे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -