Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीपावसाळ्यात आजार वाढले, कोव्हिडसारखी लक्षणे!

पावसाळ्यात आजार वाढले, कोव्हिडसारखी लक्षणे!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असे संसर्गजन्य आजारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील १६ टक्के कुटुंबात संसर्गजन्य किंवा कोव्हिडसारखी लक्षणे आढळत असल्यामुळे या आजारांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे सांगण्याची वेळ आहे.

केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. इन्फ्लुएंझा ए आणि इन्फ्ल्यूएंझा बी विषाणूच्या व्यतिरिक्त आता कोविडच्या नव्या सब-व्हेरीयंटचा देखील शिरकाव झाला आहे.

आजारांचे प्रमाण वाढले

एका राष्ट्रीय सर्व्हेक्षणात असे आढळून आले आहे की, अनेक घरांमध्ये एकापेक्षा जास्त सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, लक्षणे रुग्णालयात भर्ती करण्याइतकी गंभीर नसल्याचेदेखील आढळून आले आहे.

दरम्यान, इन्फ्ल्यूएन्झाच्या प्रकारातील एच १ एन १ आणि एच ३ एन२ च्या रुग्णांची मोठी संख्या आढळत आहे. राज्यात १ जानेवारी ते ७ ऑगस्टपर्यंत एकूण संशयित रुग्णांची संख्या ९ लाख १६ हजारांवर गेली आहे. ऑसेलटॅमिवीर दिलेल्या संशयित फ्ल्यू रुग्णांची संख्या ६ हजार ५२० वर गेली तर इन्फ्ल्यूएन्झा ए (एच १एन२ आणि एच ३एन२) रुग्णांची संख्या जवळपास २ हजारांवर पोहोचली आहे.
एच १एन१ मुळे १ जानेवारीपासून ७ जणांचा मृत्यू झालाम तर, एच ३ एन २ मुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.. राज्यात रुग्णालयात उपचार घेतलेले रुग्ण १४६ झाले आहेत. सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणं असलेल्या राज्यातील रुग्णांची संख्या १६ टक्के आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये हाच आकडा २१ टक्के, तर कर्नाटकात ३३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.
घाबरू नका, काळजी घ्या

कोविड १९ किंवा इन्फ्ल्यूएन्झाबाबत नियमित रुग्ण सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्याअसून लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना देखील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविडचा प्रादुर्भाव अतिशय कमी आणि रुग्णसंख्यादेखील कमी असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत नव्या व्हेरियंटचा शिरकाव

कोरोना व्हायरसचा नवीन एरिस व्हेरियंट पहिल्यांदा ब्रिटन (यूके) मध्ये आढळून आला, त्यानंतर तो वेगाने पसरत आहे. आता ब्रिटननंतर मुंबईमध्येही कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -