Tuesday, July 16, 2024
Homeदेशजम्मू-काश्मीरसह उत्तराखंडमध्ये हाहाकार! अमरनाथ यात्रा थांबवली

जम्मू-काश्मीरसह उत्तराखंडमध्ये हाहाकार! अमरनाथ यात्रा थांबवली

भूस्खलनामुळे हॉटेल कोसळले, जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, केदारनाथमध्ये भूस्खलनाने २ लहान मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसह उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा थांबवावी लागली. लोकांना राष्ट्रीय महामार्ग-४४ वर प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये रामपूरमध्ये डोंगरावरून दगड पडल्याने हॉटेल कोसळले. रुद्रप्रयागच्या उत्तरकाशीमध्ये रस्त्याचा काही भाग कोसळला.

पौरी गढवाल जिल्ह्यातील थाना कोटद्वार अंतर्गत मालन पुलाजवळ १५ जण नदीत अडकले होते. ज्यांना एसडीआरएफच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. हल्दवणीमध्ये ३ तास मुसळधार पाऊस झाला.

काठगोदामच्या कलसियामध्ये अडकलेल्या १५० जणांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. गौळा नदीत मुसळधार पाणी आले असून, त्यानंतर बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

याच कलशिया नाल्यात घरांचे मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत दोन घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

केदारनाथमध्ये भूस्खलनाने २ लहान मुलांचा मृत्यू

केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये जमीन खचल्याची घटना घडली असून तीन लहान मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातील दोन लहान मुलांचा मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -