Thursday, July 3, 2025

BCCI : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना बीसीसीआयने यंदा भरला 'इतक्या' कोटींचा आयकर

BCCI : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना बीसीसीआयने यंदा भरला 'इतक्या' कोटींचा आयकर

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून ओळखले जाते. आयपीएल सुरु केल्यापासून बीसीसीआयचा महसूल देखील अनेक पटींनी वाढला आहे. याचा फायदा भारत सरकारच्या तिजोरीवरही झाल्याचे दिसून आले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.


आयसीसीच्या एकूण महसुलातील जवळपास ३९ टक्के म्हणजेच वर्षाला २००० कोटी रुपये हे बीसीसीआयला मिळतात. आयपीएल, मीडिया राईट्स, स्पॉन्सर, जर्सी टायटल स्पॉन्सर यातूनही बीसीसीआयला हजारो कोटी मिळतात. त्यामुळेच २०२१-२२ मध्ये बीसीसीआयने किती इन्कम टॅक्स (Income Tax) भरला असा प्रश्न राज्यसभेत विचारला गेला.


राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. बीसीसीआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ११५९ कोटी टॅक्स भरल्याची माहिती दिली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम ३७ टक्के जास्त आहे.


बीसीसीआयने २०२०-२१ मध्ये ८४४.९२ कोटी इन्कम टॅक्स भरला होता. २०१९-२० मध्ये ८८२.२९ कोटींचा टॅक्स भरला होता. त्यापूर्वी २०१९ मध्ये ८१५.०८ कोटी व २०१७-१८ मध्ये ५९६.६३ कोटी इन्कम टॅक्स भरला होता. बीसीसीआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७६०६ कोटींचा महसूल कमावला आणि त्याचा खर्च हा ३०६४ इतका झाला. २०२०-२१ मध्ये ४७३५ कोटीच्या महसूलातील ३०८० रुपये खर्च केले होते.

Comments
Add Comment