Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईत धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेला डब्याबाहेर फेकले, आरोपी अटकेत

मुंबईत धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेला डब्याबाहेर फेकले, आरोपी अटकेत

मुंबई : मुंबईत रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local) एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तर आता धावत्या एक्स्प्रेसमधून (Express) एका महिलेला धक्का मारुन कोचबाहेर फेकण्याची धक्कादायक दादर स्थानकात घटना घडली. या घटनेत सुदैवाने महिला प्रवासी बचावली आहे.

आरोपीचे नाव मनोज चौधरी असून त्याला पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर अटक केली.

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या महिला डब्यात ही घटना घडली असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगितले. ही घटना रविवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेतील पीडित महिलेचे वय २९ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, हल्लेखोराचा प्रतिकार करत असताना आरोपीने धावत्या ट्रेनमधून तिला धक्का मारून बाहेर फेकले. महिलेने पोलिसांना पुढे सांगितले की, ट्रेन दादर स्थानकात प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा सर्वसाधारण महिला डब्यातील सर्व महिला प्रवासी खाली उतरल्या. त्यावेळी पीडित महिला त्या डब्यात एकटीच राहिली होती. ही संधी पाहून आरोपीने डब्यात प्रवेश केला.

पीडितेने त्याला विरोध केला असता आरोपीने तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती ट्रेनमधून फेकली गेली तेव्हा ट्रेनने प्लॅटफॉर्म ओलांडला नव्हता. त्यामुळे ही पीडित महिला प्लॅटफॉर्मवर पडली. धावत्या ट्रेनमधून पडल्याने ती जखमी होऊन बेशुद्ध झाली.

पोलिसांनी आरोपी मनोज चौधरीला (वय ३२ वर्ष) सीएसटी रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी दारूच्या नशेत होता. जेव्हा महिलेने त्याला महिलांच्या डब्यात चढण्यास आक्षेप घेतला तेव्हा आरोपीने महिलेला ट्रेनमधून ढकलले. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -