Friday, June 13, 2025

राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण?

राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण?

भाजप आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल


मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक पळविणारा औरंग्या कोण होता? राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण होता? बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण होता? आता कोठडी दिसायला लागली तर नाती आठवली! अशा कपटी वृत्तीचा खऱ्या औरंग्या कोण? असा खरमरीत सवाल भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.





ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मी असताना दंगल झाली का, आज देखील औरंगजेब जिवंत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिंवत आहे का, फडणवीस साहेब तुमच्या पक्षात दडला आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Comments
Add Comment