Saturday, June 14, 2025

Video : पुणेकर काहीही करु शकतात... ‘हात दाखवा आणि मेट्रो थांबवा’

Video : पुणेकर काहीही करु शकतात... ‘हात दाखवा आणि मेट्रो थांबवा’

'पुणे तिथे काय उणे'


पुणे : ‘हात दाखवा आणि एस. टी. थांबवा’ हा प्रकार तुम्ही अनेकदा पाहिला असेल. अनेकांनी धावती एसटी थांबवून प्रवासही केला असेल. पण मेट्रोचं काय? कोणाला कधी हात दाखवून सुटलेली मेट्रो थाबवल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा, पुणेकरांनी अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलेय.


हा व्हिडीओ @PuneCityLife या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी म्हणतायेत, पुणेकरांसाठी काहीही अशक्य नाही, “येत्या काळात ते हात दाखवून विमान सुद्धा थांबवतील.”


एकदा का मेट्रोचे दरवाजे बंद झाले की मग ते उघडले जात नाहीत. त्यामुळे प्रवास करायचा असेल तर वेळेत प्लॅटफॉर्मवर हजर राहा असा एक सर्वमान्य नियम आहे. पण पुणेकर मात्र या नियमाला अपवाद ठरताना दिसत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोचे दरवाजे बंद होऊन ती सुटण्याच्या तयारीत आहे. तेवढ्यात एक वृद्ध व्यक्ती येतो आणि मोटरमनला दरवाजे उघडण्याची विनंती करतो. मग मोटरमन देखील त्या वृद्ध व्यक्तीच्या वयाचा मान राखत दरवाजे उघडून त्याला आतमध्ये जाण्याची संधी देतो. त्यानंतर दरवाजे बंद होताच आणखी एक व्यक्ती येतो आणि हात दाखवून दरवाजे थांबवण्याची विनंती करू लागतो. मग मोटरमन दरवाजे उघडून त्याला सुद्धा मेट्रोमध्ये चढण्याची संधी देतो. हात दाखवून मेट्रो थांबल्याचा प्रकार फारच दुर्मीळ आहे. त्यामुळे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकरी गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला?



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment