मुंबई पोलीस पुन्हा एकदा अलर्ट मोडवर
मुंबई : मुंबईत अतिरेकी हल्ल्यांच्या (Terrorist attacks) धमक्यांचे सत्र सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. हा धमकीचा कॉल (Threat call) करणार्याला अवघ्या दोन तासांतच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विलेपार्ले येथून पकडले. यानंतर आता थेट मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला (Mantralaya Control room) धमकीचा फोन आला असून यामुळे मुंबई पोलीस पुन्हा एकदा अलर्ट मोडवर (Alert mode) आले आहेत.
मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला आलेल्या या फोनद्वारे येत्या एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. काल सोमवारी रात्री १० वाजता नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर (Landline) हा धमकीचा फोन आला आहे. अतिरेकी हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी होणार याचं स्थळ धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलेलं नाही. धमकीचा फोन येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. धमकीचा कॉल ट्रेस करण्याचे काम सुरू आहे. तसेच तपासात कांदिवली येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीमध्ये काही तथ्य नसल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते. त्यामुळे आता आलेल्या धमकीत तथ्य आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra