
सातारा: सातारा (Satara) जिल्ह्यातील ऊसतोड करणाऱ्या दामप्त्याच्या लेकीनं कौतुकास्पद कामगिरी करत भारताचे नाव जागतिक पटलावर नेले आहे. माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. काजलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाने भारतीय ज्युनिअर हॉकी संघात स्थान मिळवलंय. आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल आटपाडकर ही जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे चार देशांच्या ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे नेतृत्व करणार आहे.
काजलचे आईवडील ६ महिने गावाकडे येऊन मिळेल तेथे मजुरी करतात. मजुरी करुन कुटुंब चालवणारे नकुसा आटपाडकर आणि सदाशिव आटपाडकर यांची मुलगी काजलने अटकेपार झेंडा फडकावून भारताचे नाव रोशन करण्यासाठी ती जिद्दीने हॉकी स्पर्धेत उतरली आहे. तिच्या झालेल्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.