Friday, July 11, 2025

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया चाहत्यांवर फिदा! व्हिडिओ झाला व्हायरल!

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया चाहत्यांवर फिदा! व्हिडिओ झाला व्हायरल!

मुंबई : जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर "जेलर" फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही खऱ्या अर्थाने आपल्या चाहत्यांवर फिदा असून तिने दाखवलेल्या दयाळूपणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.


एका कार्यक्रमात बाऊन्सर्सने तमन्नाच्या चाहत्याला चुकून बाजूला ढकलले कारण त्याने त्याच्या आवडत्या सेलिब्रिटीच्या म्हणजे तमन्ना जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या सोबत फोटो काढण्‍यासाठी तमन्नाकडे जाण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र गोंधळलेल्या गर्दीत अतिउत्साही चाहत्याला बाऊन्सरने बाजूला ढकलून दिले.


ही दुर्दैवी घटना लक्षात घेऊन तमन्नाने त्वरीत हस्तक्षेप केला आणि निराश झालेल्या चाहत्याकडे ती गेली आणि हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी आणि सहकारी सेलिब्रिटींकडून याचं खूप कौतुक झालं.





तमन्ना सध्या यशाच्या शिखरावर आहे. 'जी करदा' आणि 'लस्ट स्टोरीज २' हे दोन उत्तम प्रोजेक्ट्स यशस्वी झाल्या नंतर तिचं तामिळ चित्रपट 'जेलर' मधील 'कावाला' हे गाणे एक दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या नंतर आणि इंटरनेटवर एक लाखाहून अधिक रील्स ट्रेंडिंगसह प्रचंड चार्टबस्टर बनले आहे. १० आणि ११ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार्‍या 'जेलर' आणि 'भोला शंकर' या तिच्या 'तमिळ' आणि 'तेलुगु' चित्रपटांसाठी ती उत्सुक आहे. मल्याळममध्ये 'बांद्रा' तमिळमध्ये 'अरनामाई ४' आणि हिंदीमध्ये 'वेदा' यात ती झळकणार आहे.

Comments
Add Comment