Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीसिनियर कलाकारांनी माझ्यासोबत रँगिंग केले, इतका धसका घेतला की...

सिनियर कलाकारांनी माझ्यासोबत रँगिंग केले, इतका धसका घेतला की…

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार  वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. मराठी आणि हिंदी सिरियलमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सई रानडेला (Sai Ranade) सध्या चर्चेत आली आहे. खलनायिकेच्या भुमिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या सईच्या आयुष्यात मात्र खलनायक असल्याची कबुली तिनं दिली आहे. मनोरंजन क्षेत्रातील पदार्पणाच्या काळात रॅगिंगला सामोरे जावे लागल्याचे सईने म्हटले आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले, समिधा, मृणाल आणि सई रानडे या चौघी खास मैत्रिणी नेहमी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत असलयाचे पाहायला मिळतात. माहोल मुली असा एक ग्रुप त्यांनी सध्या सुरु केला आहे. यामध्ये त्या प्रमाण मराठी भाषेमधील काही शब्द वऱ्हाडी भाषेत कशापद्धतीने बोलले जात असतात किंवा त्या शब्दांना दुसरा पर्यायी वऱ्हाडी शब्द काय वापरायचे याबद्दल सांगत असताना नेहमी दिसून येत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saii Ranade-Sane (@saii.ranade)

कायम चर्चेत राहणाऱ्या या चौघींनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना त्या चौघींच्या मैत्रीविषयी विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावेळी सईने भार्गवी चिरमुलेबद्दल सांगत असताना सिरीयलमध्ये तिला झालेल्या त्रासाबद्दल तिने यावेळी सांगितले आहे. “मी मनोरंजन क्षेत्रात जेव्हा एन्ट्री केले, त्यावेळेस माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझ्या सहकलाकारांनी माझं रॅगिंग केल्याचा धक्कादायक खुलासा तिने यावेळी केली आहे. यामध्ये भार्गवी चिरमुले नव्हती. परंतु मी यामुळे इतकी कंटाळले होते की मी मनोरंजनक्षेत्र सोडून पुण्याला परत जाण्याच्या विचारात होते. कारण या रॅगिंगमुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

सई सुरुवातीला मॉडेलिंग करत होती. वहिनीसाहेब ही सईची पहिलीच सिरीयल होती. या सीरियलमध्ये तिने जानकी किर्लोस्कर ही मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर ती कस्तुरी या सीरियलमध्ये देखील मुख्य भूमिकेत झळकली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -