
डेंग्यूचा वाढता प्रकोप पाहता महानगर पालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हा परिषदेला भेट दिली. तेथील एकंदरीत परिस्थिती पाहून त्यांना धक्का बसला. अध्यक्ष , उपाध्यक्ष व सभापती यांच्या सर्वांच्या कार्यालयात पथकाला कुलरच्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंत्र्याचे बंगले तपासले तर तेथे पण पालिकेच्या पथकाला डेंग्यूच्या अळ्या आढळल्या.
मागच्या काही दिवसापासून नागपूर मध्ये सतत पाणी कोसळत आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याने शहरातील उत्तर व पूर्व नागपूर भागात डेंग्यूचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या जनजागृतीचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. मात्र मागच्या ७ दिवसात डेंग्यूचे 44 रुग्ण आढळल्याने नागपूर मध्ये परिस्थिती चिंतेची बनली आहे.