Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीमाणगांव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

माणगांव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

सुशोभिककरण कामाचा ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

माणगांव (वार्ताहर) : रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव रेल्वेस्थानकाच्या रस्ता काँक्रिटीकरण व सुशोभिककरण कामाचा ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी (दि. ८ ऑगस्ट) संपन्न झाला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे हे ऑनलाईन सहभागी झाले होते. माणगांव स्थानकाचे सुशोभिकरण करून प्रवाशांना थांबण्यासाठी आधुनिक कॅनॉपी शेड, आसन व्यवस्थेसह व पोच मार्गाचा काँक्रीट रस्ता, फुटपाथ, पार्कींग व्यवस्था इ. बाबींसह सुसज्ज स्थानक बनविण्यात येणार आहे. तसेच या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी दुचाकी, रिक्षा व चार चाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग,आकर्षक बगीचा व आधुनिक महिला व पुरूष स्वच्छतागृह, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे.

या कार्यक्रमाला आ. प्रशांत ठाकूर, माजी आ. धैर्यशील पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,अप्पर जिल्हाधिकारी थोरवे, माणगांव उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, माणगांव तहसीलदार विकास गारुडकडर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव रवी मुंढे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव, शिवसेना नेते अॅड. राजीव साबळे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, शिवसेना माणगांव तालुका प्रमुख अॅड. महेंद्र मानकर, निलेश थोरे, महिला जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर, हेमा मानकर,उपनगराध्यक्ष राजेश मेहता, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, रत्नाकर उभारे, दिलीप जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर देखमुख,भाजप माणगांव तालुकाध्यक्ष उमेश साटम, सरचिटणीस गोविंद कासार, युवराज मुंढे, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय मोने, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, अश्विनी खरे, निलम काळे आदी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन सार्वजनिक बांधकाम महाड उपविभाग माणगावचे उपअभियंता गणगणे व त्यांची माणगांव टीमने मोलाची भूमिका बजावली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -