Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडी100 crores scam : किरीट सोमय्या पुन्हा राजकीय मैदानात; उद्धव ठाकरेंवर केला...

100 crores scam : किरीट सोमय्या पुन्हा राजकीय मैदानात; उद्धव ठाकरेंवर केला १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

काय आहे ‘हे’ प्रकरण?

मुंबई : बड्या नेत्यांचे घोटाळे उघडे पाडण्यात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) नेहमीच पुढे असतात. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर ज्या कोविड घोटाळ्याप्रकरणी (Covid centre scam) गुन्हा दाखल झाला आहे, त्याबद्दलही किरीट सोमय्या यांनी आधीच वक्तव्य केले होते. ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांनीदेखील (Ravindra Waikar) ५०० कोटींचा घोटाळा केला असल्याचं सोमय्यांनी उघड केलं होतं. या प्रकरणी आता वायकरांची चौकशीही सुरु आहे. त्यातच आता किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरले असून आणखी एक घोटाळा उघड पडण्याच्या मार्गावर आहे.

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आर्थिक घोटाळे समोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळेस त्यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी केलं ट्विट

दरम्यान किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘उध्दव ठाकरे सेनेच्या नेत्याला त्यांच्या संबंधित ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड कंपनीला मुंबई महानगरपालिकेने मुलुंड रिचार्डसन क्रूडास मैदानावरील तात्पुरते कोविड हॉस्पिटलच्या नावाने रु. १०० कोटींचे गिफ्ट दिले. १८५० खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचे या ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टेंसी प्रा. लि. कंपनी ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती.

१०० कोटींचा घोटाळा

७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२२ असे २५ महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला ९० कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी १० कोटी रुपये दिले असे मिळून १०० कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

१५ कोविड सेंटरसाठी ७०० कोटी रुपये भाडे घोटाळे

रिचार्डसन क्रूडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील १५ कोविड सेंटरसाठी ७०० कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत, असा सोमय्या यांचा आरोप आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -