Saturday, July 5, 2025

रामदास आठवलेंची युतीबाबत मोठी घोषणा, वाचा नेमकं काय म्हणाले?

रामदास आठवलेंची युतीबाबत मोठी घोषणा, वाचा नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपला साथ देणार असून त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा देशात दिसणार आहे. तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत युती करणार असल्याचा ठराव आज पक्षाच्या येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.


नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे आठवले यांच्या अध्यक्षतेत रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. त्यात विविध ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीस काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशभरातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राष्ट्रीय संघटन सचिव भुपेश थुलकर, कर्नाटकचे वेंकट स्वामी, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, दयाळ बहादूर, सुरेश बारशिंग, एम. एस. नंदा, विजयराजे ढमाल, महिला आघाडीतर्फे सीमाताई आठवले; अॅड. आशाताई लांडगे, शिलाताई गांगुर्डे आदींची उपस्थिती होती.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा