Thursday, May 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

फवाद आलमची पाक क्रिकेटमधून निवृत्ती

फवाद आलमची पाक क्रिकेटमधून निवृत्ती

कराची (वृत्तसंस्था) : पाकिस्तान क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज फवाद आलमने पाकिस्तान क्रिकेटला रामराम ठोकला. यूएसएच्या लीग क्रिकेटमध्ये फवाद खेळणार असल्याचे समजते. फवाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे खेळला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फवाद यूएसएच्या मायनर लीग क्रिकेट टी-२० स्पर्धेत शिकागो किंग्समन संघाकडून खेळणार आहे.


फवादने २००७ साली पाकिस्तानकडून टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फवादने २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फवादने पाकिस्तानसाठी एकूण १९ कसोटी, ३८ एकदिवसीय आणि २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीच्या ३० डावांत १०११ धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९६६ धावा आणि टी-२० क्रिकेटमध्ये १९४ धावा आहेत. याशिवाय त्याच्या नावावर १५ आंतरराष्ट्रीय विकेटही आहेत.

Comments
Add Comment