Wednesday, July 9, 2025

राज्यात कोरोना रुग्ण वाढले, एकाचा मृत्यू; नव्या व्हेरिएंटमुळे चिंता

राज्यात कोरोना रुग्ण वाढले, एकाचा मृत्यू; नव्या व्हेरिएंटमुळे चिंता

पुणे : गेल्या काही दिवसांपासून जवळपास नामशेष झालेल्या कोरोना संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तसेच कोरोनाचा ओमायक्रॉन ‘इजी.५.१’ हा नवा व्हेरिएंटही आढळून आला आहे.


देशात पहिल्यांदाच या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ संशोधक आणि महाराष्ट्राच्या जिनोम सिक्वेन्सिंगचे संयोजक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात ओमायक्रॉन ‘इजी.५.१’ हा व्हेरिएंट सापडला होता. मात्र, त्यानंतर जून आणि जुलैमध्ये या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या लक्षणीय नव्हती. गेल्या दोन महिन्यात राज्यात केवळ एक्सबीबी.१.१६ आणि एक्सबीबी.२.३ व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत.ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत राज्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या ७० इतकी होती. पण ६ ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या करोना रुग्णांची संख्या ११५ इतकी होती. तर सोमवारी नोंदवण्यात आलेल्या सक्रिय करोना रुग्णांची संख्या १०९ इतकी आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा