Thursday, July 3, 2025

मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्यांना दणका!

मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्यांना दणका!

पनवेल : पनवेलमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या रिक्षाचालक आणि प्रवाशांचा वाद नवीन नाही. अनेकवेळा हा वाद वाहतूक शाखेत जात असतो. खारघर शहरात वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. एस. काणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विशेष मोहिमेत मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या सहा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.


या सहा रिक्षाचालकांच्या कारवाईचा अहवाल आरटीओ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काणे यांनी दिली. या कारवाईदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. मोमीन आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या व भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात तक्रार करण्याचे अवाहन यापूर्वीच आरटीओने केले आहे. याकरिता हेल्पलाईनही कार्यान्वित करण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment