Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीपाचही एन्ट्री पॉईंट टोल बंद करा

पाचही एन्ट्री पॉईंट टोल बंद करा

आदित्य ठाकरेंच्या टोल बंद मागणीत मनसेची उडी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगतीमार्गावरचे दोन टोल बंद करण्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यात उडी घेतली आहे. मुंबईतील फक्त दोनच नाही तर पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल माफ करावे अशी मागणी मनसेचे प्रवक्ते संजय शिरोडकर यांनी केली आहे. या टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रवेश करण्यासाठी अथवा बाहेर पडताना पाच एन्ट्री पॉईंट आहेत. या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल माफी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनसे प्रवक्ते संजय शिरोडकर यांनी म्हटले की, नितीन गडकरी हे १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात आलेल्या सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात ५५ उड्डाणपूल मुंबईत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाणपूलांचा बांधकाम खर्च काढण्यासाठी मुंबईतील एन्ट्री पॉईंटवरून टोल वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही टोल वसुली २००२ मध्ये सुरू करण्यात आली. सध्या दहिसर आणि आनंद नगर येथील टोलनाके बंद करा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, जुलै २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पाहणी केली होती. त्यावेळी अहवाल तयार करण्यात आला होता. यावेळी अहवालात टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन, वेळेचा अपव्यय, कामाच्या तासाचे होणारे नुकसान यामुळे साधारणपणे ६००० कोटींचे नुकसान होते. याचा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बसत असल्याकडे संजय शिरोडकर यांनी म्हटले.

एमएसआरडीसीचा असा अहवाल असताना अजूनही टोल कसे सुरू आहेत, हे एक गौडबंगल असल्याचे त्यांनी म्हटले. गलथान कारभार आणि लोकांना किती मनस्ताप होतो, हे सगळ्यांना माहीत आहे. वर्षाला ६००० कोटींचे नुकसान करणारे टोल नाके बंद झाले पाहिजे, अशी मागणीदेखील शिरोडकर यांनी केली.

मुंबईत सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग आणि ऐरोली उड्डाणपूल कॉरिडोअर या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल वसूल केला जातो. या पाचही टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी असते. वाहनांच्या रांगांमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -