Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Gadchiroli : सुरजागड लोहखाणीत झालेल्या अपघातात अभियंत्यासह तिघांचा मृत्यू

Gadchiroli : सुरजागड लोहखाणीत झालेल्या अपघातात अभियंत्यासह तिघांचा मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखाणीत उत्खनन करताना अपघात झाल्याने तरुण अभियंत्यासह दोन मजूर असे एकूण तिघे जण ठार झाले. ही घटना ६ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

अभियंता सोनल रामगीरवार (वय २६, नागेपल्ली ता. अहेरी) याच्यासह हरयाणातील दोन मजुरांचा या दुर्दैवी घटनेत समावेश आहे. हरयाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.

सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरू आहे. या पहाडीवरून उत्खनन करणारे वाहन खाली कोसळले, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळले. तेथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार व अन्य दोघे जागीच ठार झाले.

दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

या घटनेत मयत झालेले अभियंता सोनल रामगीरवार यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्यावर प्रचंड मोठा धक्का बसला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment