Tuesday, July 16, 2024
HomeदेशGyanvapi : ज्ञानवापीच्या घुमटात एएसआयला मिळाल्या अनेक डिझाइन्स

Gyanvapi : ज्ञानवापीच्या घुमटात एएसआयला मिळाल्या अनेक डिझाइन्स

छताच्या डिझाइन आणि सभामंडपात मंदिर शैलीचे २० पेक्षा जास्त आळे सापडले; भिंतींचे ३-डी छायाचित्रण केले

वाराणसी : ज्ञानवापी येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) गेल्या पाच दिवसांपासून सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणात एएसआय टीमला घुमटांच्या सर्वेक्षणादरम्यान गोलाकार छतामध्ये अनेक डिझाइन आढळले. छताच्या डिझाइन आणि सभामंडपात मंदिरांमध्ये दिसणारे २० हून अधिक आळे आढळून आळ्याने एएसआय पथकाचा उत्साह अधिक वाढला आहे.

रविवारी सकाळी एएसआयने सर्वप्रथम मुस्लिम बाजूकडून चावी घेऊन व्यास तळघराचे कुलूप उघडले. ते साफ करून एक्झॉस्ट बसवले. त्यानंतर सर्वेक्षणाला सुरुवात झाली.

ज्ञानवापीचे तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. व्यास तळघरात एएसआयने मोजमाप घेतले. भिंतींची ३-डी फोटोग्राफी, स्कॅनिंग केले. भिंतींवर आढळलेल्या कलावस्तूंचे ​​​​​​मुद्दे तक्त्यामध्ये नमूद केले.

कानपूर आयआयटीचे दोन जीपीआर तज्ञही सर्वेक्षण पथकासोबत होते. एक-दोन दिवसांत जीपीआर मशिनद्वारे सर्वेक्षण सुरू होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

साडेबारा वाजता टीमने दुपारचे जेवण आणि प्रार्थनेसाठी विश्रांती घेतली. दुपारी अडीच वाजल्यापासून पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. मुस्लीम पक्षाने लवकरच मुख्य तळघराच्या चाव्या देणार असल्याचे म्हटले आहे.

चौथ्या दिवशी, एएसआय टीमला घुमटांच्या सर्वेक्षणादरम्यान गोलाकार छतामध्ये अनेक डिझाइन आढळले. हॉलमध्येच तीन डोम सिलिंगमध्ये टीमने अनेक डिझाइन्स पाहिल्या. त्यांची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी एकामागून एक करण्यात आली.

या सभामंडपात मंदिरांमध्ये दिसणारे २० हून अधिक आळे (भिंतीमध्ये बनवलेले कॅबिनेट, त्याला पूर्वांचलमध्ये टाके म्हणतात) पाहिले गेले आहेत. आळ्यांची रचना आणि त्यांच्या सभोवतालची वैशिष्ट्ये यांचे ३-डी मॅपिंग देखील होते. हिंदू बाजूने आम्ही पुढे जात असल्याचे सांगितले. घुमटाचे संपूर्ण सर्वेक्षण होण्यास वेळ लागेल, परंतु छताच्या डिझाइनमुळे आमचा उत्साह वाढला आहे.

अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीचे संयुक्त सचिव एसएम यासीन यांनी फोनवर सांगितले की, हिंदू बाजूचे वकील एएसआय टीमवर दबाव आणत आहेत. हिंदू बाजूने वाद घालणाऱ्यांच्या वक्तव्यांवर प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. हिंदू बाजूच्या वादींचे म्हणणे थांबवले नाही तर ते कायदेशीर प्रक्रियेचा सहारा घेतील.

संपूर्ण ज्ञानवापी इमारत एकाच वेळी पाहण्यासाठी उपग्रहाद्वारे थ्रीडी प्रतिमा तयार करण्यात येत आहे. यामध्ये टीम थ्रीडी इमेजिंग, मॅपिंग आणि भिंतींचे स्क्रीनिंगही करणार आहे. रविवारी एएसआयचे ५८ लोक, हिंदू बाजूचे ८ आणि मुस्लिम बाजूचे ३ लोक उपस्थित होते.

शनिवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. अजय कुमार विश्वेश यांच्या कोर्टाने आदेश दिला की एएसआयला २ सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण अहवाल सादर करावा लागेल.

दरम्यान, हिंदू बाजूचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, “शनिवारी पश्चिमेकडील भिंतीचा अभ्यास करण्यात आला. मी मध्य घुमटाच्या खाली असलेल्या एका पोकळ जागेतून आवाज येत असल्याचे निदर्शनास आणले. त्याचे सर्वेक्षण केले जात आहे. मध्यवर्ती घुमटाशेजारी असलेल्या भागाचे सर्वेक्षण केले जात आहे. रविवारी व्यासजींचे तळघर उघडणार असल्याचे जैन यांनी सांगितले होते. तळघर साफ करण्यात आले आहे.

त्याच वेळी, हिंदू बाजूच्या महिलांनी सांगितले की, आम्ही मशिदीच्या आत जात नाही कारण महिला मशिदीच्या आत जात नाहीत. आम्हाला आशा आहे की या सर्वेक्षणातून बरेच काही स्पष्ट होईल. अशी अनेक चिन्हे, मूर्ती येथे आहेत जे सांगतात की येथे हिंदू मंदिर होते.

यापूर्वी शनिवारी, हिंदू पक्षाचे वकील अनुपम द्विवेदी यांनी दावा केला होता की ज्ञानवापीत मूर्तींचे काही तुकडे सापडले आहेत, उपग्रहावरून मॅपिंग (फ्रेमिंग-स्कॅनिंग) तसेच पुरातन मंदिराचे अवशेष आहेत. एक-दोन दिवसांत ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) येणार आहे. यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. भिंतींवर दिसणारा आकार आणि भंगलेल्या मूर्तींची वेळ मूर्तीशास्त्रातील शास्त्रांशी जुळवून ठरवली जाईल.

सूत्रांनी सांगितले की, जीपीआर सर्वेक्षणासाठी आयआयटीचे तज्ज्ञ पथक पोहोचले आहे. दोन दिवसांनी ज्ञानवापी कॅम्पसमध्ये जीपीआर मशीन बसवण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. यानंतर ही टीम सर्वेक्षणाच्या पुढील टप्प्यात पोहोचेल.

एएसआयने चार सेक्टर बनवून १०० मीटर एरियल व्ह्यू फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली. पश्चिमेकडील भिंती, भिंतीवर पांढरा धुतलेला चुना, विटांमधील राख आणि चुना यासह अनेक मातीचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. यामध्ये दगडाचे तुकडे, भिंतीची पुरातनता, पाया आणि भिंतींच्या कलाकृती, माती आणि तिचा रंग, अवशेषांची पुरातनता यासह अन्नधान्याचा नमुना गोळा करण्यात आला आहे. याशिवाय एएसआयने तुटलेल्या मूर्तीचा तुकडाही नमुन्यात समाविष्ट केला आहे. आतील वर्तमान स्थिती देखील डिजिटल नकाशामध्ये चिन्हांकित केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -