Thursday, November 14, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वFake E-mails : आयकर परतावा; बनावट ई-मेल

Fake E-mails : आयकर परतावा; बनावट ई-मेल

  • अर्थसल्ला : महेश मलुष्टे, चार्टर्ड अकाऊंटंट.

याआधीच्या माझ्या लेखांमधून मी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या लेखात मी थोड्या वेगळ्या विषयाची पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती देणार आहे. काही विशिष्ट प्रकारचे संदेश पाठवून लोकांना आर्थिकदृष्ट्या फसवण्याचे काम सध्या चालू आहे. हे संदेश कोणते याची आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे.

सध्या आयकर परतावा असल्याचा एक बनावट ई-मेल काही लोकांना येत आहे. सदर ई-मेलचा मायना पुढीलप्रमाणे असतो. तुम्हाला रु. १५,४९०/- चा आयकर परतावा मंजूर झाला आहे. ही रक्कम तुमच्या खात्यात लवकरच जमा केली जाईल. कृपया तुमचा खाते क्रमांक ५xxxxxx६७५५ बरोबर आहे की नाही ते तपासा. जर हे बरोबर नसेल तर कृपया खालील लिंकला भेट देऊन तुमचे बँक खाते माहिती अद्ययावत करा. हा संदेश बनावट आहे. आयकर विभाग, खाते अद्यावत करण्यासाठी कोणताही बाह्य दुवा देत नाही याची सगळ्यांनी नोंद केली पाहिजे. तसेच आपण आपल्या आयकर विवरण पत्रात मागणी केलेल्या परताव्याखेरीज फक्त व्याजाच्या पोटी काही रक्कम देते, म्हणून आपण आपल्या विवरण पात्राच्या पोचपावती सोबत परताव्याची रक्कम तपासून पाहावी. तसेच आयकर विभाग मुख्य मायन्यात परताव्याची रक्कम लिहीत नाही, त्याची माहिती पासवर्ड संरक्षित पी. डी. एफमध्ये असते. आयकर विभागाच्या अधिकृत संकेत स्थळात लॉगिन करूनच बँकेचे खाते अद्यावत करता येते. त्यामुळे अशा संदेशाला बळी पडू नये.

सायबर गुन्हे विभागाकडून असल्याचा बनावट ई-मेल

[email protected] या ई-मेल आयडीवरून एक न्यायालयीन आदेश असल्याचा एक बनावट ई-मेल काही जणांना येत आहे. त्याचा मुख्य मायना पुढीलप्रमाणे असतो. पोलीस इंटेलिजेंस ब्युरो, सायबर क्राईम स्पेशल युनिटद्वारे कार्य करते, जे सायबर गुन्ह्यांचे सर्व गुंतागुंतीचे आणि संवेदनशील प्रकरणे हाताळते. ज्यात तुमच्याविरुद्ध संलग्न न्यायालयाच्या आदेशाबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, आम्हाला सूचित करण्यास अजिबात संकोच करू नका. २४-४८ तासांच्या आत न्यायालयाच्या या आदेशाची उत्तर देण्यास अयशस्वी झाल्यास तुमच्याविरुद्ध गंभीर कायदेशीर कारवाई केली जाईल. भारत सरकारच्या कोणत्याही एजन्सीद्वारे असा कोणताही ई-मेल पाठवला जात नाही, याची सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

बेकायदेशीर कर्ज ॲप्सकडे लक्ष द्या!

सायबर दोस्त या गृह मंत्रालय, भारत सरकारद्वारे हाताळल्या जाणाऱ्या सायबर-सुरक्षा आणि सायबर सुरक्षा जागरूकता करण्यासाठी असलेल्या ट्विटर अकाउंटवरून प्रकाशित झालेल्या माहितीनुसार काही कर्ज देणारी फसवी ॲप मार्केटमध्ये आली आहेत. त्यापैकी काही ठरावीक ॲपची नावे पुढीलप्रमाणे “Rupiya Box” “Mobile Money” “Fino Wallet” “Cash Prosper” “LendEasy-Personal Loan App” “EMC-Online Personal” “Fast Rupee: Dhani loan card” इत्यादी. ॲप डाउनलोड करतेवेळी पुढील गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. तुमची वैयक्तिक माहिती, संपर्क आणि सोशल मीडिया खात्यांमध्ये अनावश्यक प्रवेश मागणारे ॲप्स टाळा.
योग्य दस्तऐवज किंवा क्रेडिट चेकशिवाय त्वरित कर्ज देण्याचे वचन देणाऱ्या ॲप्सपासून सावध राहा. वास्तविक बँकांमध्ये नेहमी पडताळणी प्रक्रिया असते. ॲप डाउनलोड करण्यापूर्वी नेहमी अटी व शर्ती वाचा.

सायबर गुन्ह्याबद्दल तक्रार नोंदवायची असल्यास https://cybercrime.gov.in/Webform/Crime_AuthoLogin.aspx या लिंकवर जाऊन आपण तक्रार नोंदवू शकता अन्यथा आपण १९३० या नंबरवर कॉल करूनदेखील आपली तक्रार नोंदवू शकता.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -