
नवी दिल्ली : इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले आहे की, "५ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चांद्रयान-३ Chandrayaan3 या अंतराळयानाने पाहिलेला चंद्र."
चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहचले आहे. चंद्राच्या अगदी जवळ ते पोहोचले असून २३ ऑगस्टला उतरण्याची जय्यत तयारी झाली आहे.
The Moon, as viewed by #Chandrayaan3 spacecraft during Lunar Orbit Insertion (LOI) on August 5, 2023.#ISRO pic.twitter.com/xQtVyLTu0c
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 6, 2023
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला, तेव्हा चांद्रयानाने अवकाशातून पहिला व्हिडिओ पाठवला आहे, ज्यामध्ये अप्रतिम दृश्य दिसले. चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत केलेला प्रवेश आणि चंद्राभोवती घिरट्या मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Chandrayaan-3 Mission Update:
Lunar Orbit Insertion (LOI) maneuver was completed successfully today (August 05, 2023). With this, #Chandrayaan3 has been successfully inserted into a Lunar orbit.
The next Lunar bound orbit maneuver is scheduled tomorrow (August 06, 2023), around… pic.twitter.com/IC3MMDQMjU
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 5, 2023
१४ जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर चांद्रयान-३ ने शुक्रवारपर्यंत दोन तृतीयांश अंतर कापले होते. यावेळी चांद्रयान-३ चंद्राभोवती प्रचंड वेगाने प्रदक्षिणा घालत आहे. जर सर्व काही ठीक झाले तर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. या घटनेकडे संपूर्ण देशासह जगभरातून सर्वांचे लक्ष आहे.