मणिपूर : गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमधील हिंसाचार (Manipur violence) रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत येथील सरकारमधील एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या कुकी पीपल्स अलायन्सने एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
रविवारी रात्री पाठींबा काढण्याचा निर्णय घेऊन पक्षाने याची घोषणा देखिल केली आहे. मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यापासून तणावाचे वातावरण आहे. राज्यामध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि तीन महिन्यांनंतरही परिस्थिती सामान्य होत नसल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमध्ये कुकी पीपल्स अलायन्सच्या दोन आमदारांचा समावेश होता.
४ मे २०२३ रोजी मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान भडकलेली हिंसा अद्याप थांबलेली नाही. तेव्हापासून मणिपूर हिंसेच्या आगीत होरपळत आहे. रविवारीही राज्यातील काही भागात जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळेच सायंकाळी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक झाली आणि त्यानंतर हा टोकाचा निर्णय घेण्यात आला.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra