
अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयाला भीषण आग (AIIMS Fire) लागल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या (Delhi Fire Brigade) आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एम्सच्या एंडोस्कोपी कक्षात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज घडलेल्या या घटनेनंतर इमारतीतून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे दिसून आले.
पीटीआयने (PTI) दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती सुमारे ११:५४ वाजता मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जुन्या ओपीडीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या इमर्जन्सी वॉर्डच्या वर असलेल्या एंडोस्कोपी कक्षात ही आग लागली. खोलीतील सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे, असे पीटीआयने एम्सच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले.
दिल्लीतील एम्स रुग्णालयात देशभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. यासोबतच येथे विदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दररोज सुमारे १२ हजार रुग्ण उपचार घेतात.