मुंबई: मुंबई महापालिकेने कोरोना काळात दिलेल्या कंत्राटाची मुंबई पोलीस आणि ईडी कडून चौकशी सुरू असताना बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या (BMC) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त या दोघांवरील गुन्हा दाखल करण्यात आला असून आता मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही चौकशीची टांगती तलवार आहे.
कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या व्यवहाराची कसून चौकशी सुरू असताना त्यात कोरोना काळात खरेदी केलेल्या बॉडी बॅगमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आले आहे.
नेमका हा कथित बॉडी बॅग घोटाळा आहे काय?
– कोरोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग्स या वाढीव दराने खरेदी करण्यात आल्या
– १ हजार ८०० ते २ हजार किमतीच्या बॉडी बॅग्स या ६ हजार ८०० रुपये किमतीने मुंबई महापालिकेने खरेदी केल्या.
– बॉडीबॅग खरेदीचे कंत्राट माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरून देण्यात आल्याचा ईडीच्या तपासात समोर आलं आहे.