Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीस्टंटबाजांना पोलिसांचा सज्जड दम, स्टंट थांबवा नाहीतर पोलिस 'अशी' कारवाई करणार

स्टंटबाजांना पोलिसांचा सज्जड दम, स्टंट थांबवा नाहीतर पोलिस ‘अशी’ कारवाई करणार

नाशिक: नाशिकच्या मालेगावातील (Malegaon) गिरणा नदी पात्रातील केटिवेअर बंधाऱ्याच्या पुलावरून पाण्यात उड्या मारणाऱ्या स्टंटबाजांची बातमी समजताच मालेगाव पोलिसांनी स्टंटबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी गिरणा नदी पात्रावर असलेल्या पुलावर जाऊन स्टंटबाजांना अक्षरशः पिटाळून लावत स्टंटबाजी करणाऱ्यांना सज्जड दम देखील भरला.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने गिरणा नदीला (Girna River) खूप पाणी आले आहे. ही नदी मालेगाव शहरातून जात असल्याने सुटीच्या दिवशी गिरणा नदीच्या केटीवर बंधाऱ्याच्या भिंतीवर अनेक तरुण आणि लहान मुले मोठ्या संख्येने जमतात. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ टाकण्यासाठी तरुणांकडून (Stunt) अनेक जीवघेणे प्रकार केले जातात. हा प्रकार सध्या मालेगावमधील गिरणा नदीच्या केटीवर बंधाऱ्यावर होताना दिसून आला. अनेकांकडून भिंतीवर उभे राहून सेल्फी काढला जातो तर काही पाण्यात उड्या मारून जीवघेणी स्टंटबाजीही करतात. अनेकवेळा मुलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे पाहायला मिळते. तरुणांनो जीव धोक्यात टाकू नका, वेळीच सुधरा आणि जीवघेणी स्टंटबाजी करू नका, असे आवाहन मालेगाव अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांनी केले. दरम्यान, गिरणा पुल परिसरात परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -