अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित असणारी ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून या प्रोमोमध्ये अभिनेते किरण माने यांची झलक दिसत आहे. नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करून ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेची माहिती दिली आहे.
‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करून किरण माने यांनी लिहिले आहे की, ‘आपल्या एखाद्या भूमिकेने, आपल्या चाहत्यांचे जगणे समृद्ध व्हावे, अशी माझी इच्छा होती. आता ती संधी देणारे कॅरॅक्टर मी साकारतोय… सिंधुताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा ‘रियल लाईफ हिरो’…सिंधुताईंच्या आयुष्यातला ‘बाप’माणूस अभिमान साठे!. ‘ज्या काळात मुलांच्या बरोबर बसून मुलीने शिकणे म्हणजे कमीपणाचे मानले जायचे, पाप मानले जायचे, त्या काळात ‘माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे. तिने शिकावे. मोठ्ठे व्हावे. तिच्या गुणांना वाव मिळाला, तर ती खूप नाव कमावेल. हे या जगावेगळ्या बापाने ओळखले होते. संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणाऱ्या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या. संकटांचा वर्षाव झाला. पण हार मानली नाही त्याने. ‘फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर… नामाचा गजर सोडू नये’, या भावनेने विपरीत परिस्थितीशी तो झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचेच पुढे जाऊन त्या मुलीने सोने केले. सिंधुताईंचे आयुष्यही भयाण संघर्षात गेले. आईलाही नकोशी असलेली ‘चिंधी’ ते अनाथांना हवीहवीशी वाटणारी माय ‘सिंधुताई’, हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नाही. मालिकाविश्वात खूप वर्षांनी असे प्रेरणादायी आयुष्य पुढे येत आहे. ही मालिका १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…