Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडी'त्या' गोड बातमीनंतर प्रिया-उमेशेची केमिस्ट्री पाहायला लोकांची गर्दी

‘त्या’ गोड बातमीनंतर प्रिया-उमेशेची केमिस्ट्री पाहायला लोकांची गर्दी

मुंबई: सुमारे एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले. या कपलची पडद्यावरील केमिस्ट्री पाहायलाही प्रेक्षक गर्दी करत आहेत. प्रिया आणि उमेशच्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे.

या विषयी निर्माते नंदू कदम म्हणतात, ‘’ऑनलाईन, ऑफलाईन तिकीटविक्री सुरू झाल्यापासूनच नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार पडल्यामुळे खूप आनंद आहे. मला खात्री आहे, हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. तिकीट न मिळाल्याने काही प्रेक्षक नाराजही झाले आहेत, मात्र त्यांच्यासाठी आम्ही लवकरच आणखी प्रयोग सादर करू. सर्व वयोगटाला आवडेल, असे हे कौटुंबिक नाटक आहे.’’

अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -