Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीनकारात्मक राजकारणात विरोधक मश्गुल

नकारात्मक राजकारणात विरोधक मश्गुल

मोदींचा विरोधकांवर प्रहार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘देशातील विरोधक हे नकारात्मक राजकारण करण्यात मश्गुल आहेत’, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले, ‘आमचे सरकार हे सकारात्मक राजकारणावर लक्ष केंद्रित करत आहे. यांच्या (विरोधकांच्या) असल्या क्षुल्लक राजकारणापेक्षा आम्ही विकासाला प्राधान्य देतो’. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रविवारी देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केल्यानंतर एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी आरोप केला की, विरोधी पक्ष हे काम करणार नाही आणि इतरांना काम करू देणार नाही, या तत्त्वावर भर देत आहेत’.
रेल्वे मंत्रालयाने देशातील १ हजार ३०० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ या योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने देशातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठविली. मोदी म्हणाले, गेल्या ७० वर्षात यांनी एकही युद्धस्मारक बांधलेले नाही. आमच्या सरकारने जेव्हा ते बांधले तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला. विरोधी पक्ष प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत असतात. संसद भवनाच्या नवीन इमारतीलाही त्यांनी विरोधी केला होता. हे लोक कधी स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे फिरकले नाहीत. सरदार पटेल यांच्यापुढे ते कधी नतमस्तक झाले नाहीत. हे लोक स्वतः काही करणार नाहीत आणि दुसऱ्याला करू देणार नाहीत. ना काम करणार ना, करू देणार, ही त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची वृत्ती आहे आणि ते आजही त्याच वृत्तीला चिकटून बसले आहेत. त्यांनी कधी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे जाऊन आदरांजली वाहिलेली नाही. संसदेची आधुनिक इमारत बांधण्यात आली आहे, पण विरोधकांमधील काही महाभागांनी त्याला विरोधही केला. देशाचा विकास हा देशातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी त्यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ घोषणेचाही उल्लेख केला. भारतीय रेल्वेचे कौतुक करत मोदी म्हणाले, आपल्या रेल्वेने अलिकडच्या काही वर्षांमध्ये १५ लाखांहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

यांनी एकही युद्धस्मारक बांधले नाही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आम्ही कर्तव्य मार्गाचा विकास केला, परंतु यांनी त्यालाही विरोध केला. यांनी ७० वर्षात देशातील वीरांसाठी किंवा शहिदांसाठी एकही युद्धस्मारक बांधलेले नाही. परंतु, आम्ही युद्धस्मारक बांधले तेव्हा यांनी त्यावर टीका केली. युद्धस्मारकावर टीका करताना यांना लाज कशी नाही वाटली?’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -