ऑनलाईन भेट… मैत्री… लग्न!… काय आहे ही प्रेमकहाणी?
प्रेमात कोण काय करेल याचा काही नेम नाही. कधी कोणी थेट देशाच्या सीमा पार करतं तर कधी जीव द्यायला आणि घ्यायलाही तयार होतं. मोठमोठ्या कवींच्या म्हणण्यानुसार प्रेमाला वयाचंही बंधन नसतं (Love has no age limit). अगदी हेच लक्षात ठेवत २८ वर्षांची एक तरुणी थेट ७० वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. इतकंच नव्हे तर या दोघांनी लग्न केले असून त्यांच्या प्रेमाचा वृक्ष बहरत चालला आहे.
२८ वर्षीय तरुणी जॅकी (Jackie) आणि ७० वर्षांच्या डेविडची (David) ही प्रेमकहाणी (Lovestory) आहे. जॅकीनेच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या नात्याचा खुलासा केला आहे. २०१६ मध्ये हे दोघे एका डेटिंग साईटवर (Dating site) भेटले. तिथे त्यांच्या गप्पा सुरु झाल्या, छान ओळख झाली आणि या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. तीन महिन्यांत डेविड जॅकीला भेटण्यासाठी अमेरिकेतून (America) फिलिपाइन्सला (Philippines) पोहोचला. येथे दोघांनी बरेच दिवस एकत्र घालवले. त्यांच्यातील जवळीक वाढत होती.
काही दिवस भेटल्यानंतर दोघेही डेटवर जाऊ लागले. दर दोन महिन्यांनी डेविड जॅकीला भेटायला फिलिपाइन्सला यायचा. अखेर २०१८ मध्ये त्यांनी प्रेमात अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे मानले जाणारे पाऊल उचलले ते म्हणजे लग्न! त्यांचे लग्न झाल्यानंतर जॅकी कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे शिफ्ट झाली. कोरोना लॉकडाऊन दरम्यान जॅकीने स्वतःचं टिकटॉक अकाऊंट तयार केलं आणि त्यावर तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करण्यास सुरुवात केली.
वयामुळे दोघे होतात ट्रोल…
जॅकीच्या अकाऊंटवर ५० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. युजर्स तिच्या पोस्टवर विविध कमेंट करतात. मात्र, या नात्यामुळे तरुणीला खूप ट्रोल करण्यात आलं. लोक म्हणतात की, तिने पैशाच्या हव्यासापोटी एका ७० वर्षांच्या वृद्धाशी लग्न केलं. पण त्यांचं प्रेम खरं असून ते त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी असल्याचं या जोडप्याचं म्हणणं आहे. ते नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करतात.
डेविड आणि जॅकी म्हणतात…
डेविड म्हणाला, जर दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना आयुष्य एकत्र घालवायचे असेल तर वय फक्त एक संख्या आहे. लोकांनी टीका करू नये. आम्ही दोघे आनंदी आहोत. त्याचवेळी जॅकीने डेविडबद्दल सांगितले की, तो खूप साधा आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे. तो माझा आदर करतो आणि माझ्यावर त्याहून अधिक प्रेम करतो. त्याच्याशी लग्न केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra