मुंबई: सेलिब्रिटींच्या मैत्रीच्या जोड्या या चाहत्यांसाठी विशेष आकर्षण असतात. आज ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त (Friendship Day 2023) अनेक सेलिब्रिटींनी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहे. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी देखील मैत्री दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी मैत्री दिनानिमित्त एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानी कॅप्शन दिलं, ‘काही गोष्टींची सुरूवात करताना आपल्यासोबतचे सवंगडी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. माझ्या आयुष्यातील हीच ती लोकं. कोण कोण आहेत? ओळखलत तर कमेंट्समध्ये सांगा.’
View this post on Instagram
केदार शिंदेनं शेअर फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी फोटोमधील कलाकार ओळखण्याचा प्रयत्न केला. एका नेटकऱ्यानं केदारच्या फोटोला कमेंट केली, ‘भरत जाधव, अंकुश चौधरी, अरुण कदम’ अशा कमेंट्स करत केदार शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.