Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीFarmani Naaz : व्हायरल गाणे 'हर हर शंभू'ची गायिका फरमानीच्या भावाची चाकूने...

Farmani Naaz : व्हायरल गाणे ‘हर हर शंभू’ची गायिका फरमानीच्या भावाची चाकूने भोसकून हत्या!

नेमकं काय घडलं?

मुझफ्फरनगर : ‘हर हर शंभू’ (Har Har Shambhu) हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Social Media Viral) झालं आहे. या गाण्याची गायिका आणि प्रसिद्ध युट्युबर फरमानी नाझच्या (Farmani Naaz) बाबतीत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. फरमानीच्या चुलत भावाची खुर्शीदची काल संध्याकाळी उशिरा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात, शनिवारी संध्याकाळी उशिरा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी युट्युबर आणि हर हर शंभू गायिका फरमानी नाझच्या चुलत भावाची निर्घृणपणे हत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून आरोपीचा शोध सुरू केला. घटना रतनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मदपूर माफीची आहे. या हत्येचे कारण अद्याप समोर येउ शकलेले नाही.

नेमकं काय घडलं?

शनिवारी सायंकाळी उशिरा खुर्शीद नावाच्या तरुणावर तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात खुर्शीद गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपी तेथून पळून गेले. या हल्ल्याची माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी तातडीने खुर्शीद यांना रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गायिका फरमानी नाझच्या चुलत भावाचा खून झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या गावकरी आणि कुटुंबीयांनी खतौली येथील शासकीय रुग्णालयात एकच गोंधळ घातला. पोलिसांनी लोकांना शांत केले. गावातील एका बाजूच्या लोकांनी त्याची हत्या केल्याचा आरोप हे ग्रामस्थ करत आहेत.

कोण आहे फरमानी नाझ?

फरमानी नाझ अलीकडेच हर-हर शंभू हे गाणे गाऊन प्रसिद्धीच्या झोतात आली. ती इंडियन आयडॉलच्या एका भागातही दिसली होती. त्यानंतर देवबंदच्या उलेमांनी तिच्याविरोधात फतवा काढला होता. “इस्लाममध्ये गाणे आणि नाचणे निषिद्ध आहे” असे त्यात म्हटले होते. यानंतर फरमानी नाझने उलेमांना उत्तर दिले की, “जेव्हा माझे पती मला सोडून गेले, तेव्हा हे उलेमा कुठे होते. हे उलेमा महिलांच्या प्रत्येक कामाला इस्लामचे नाव देऊन हराम म्हणतात. महिला गेल्यास कुठे जायचे ते सांगा, अशा प्रकारे फरमानीने बंड पुकारला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -