Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीप्रसिद्ध क्रांतीकारी गायक 'गद्दार' यांचे निधन

प्रसिद्ध क्रांतीकारी गायक ‘गद्दार’ यांचे निधन

हैदराबाद: तेलंगणातील प्रसिद्ध क्रांतीकारी गीतकार ‘गद्दार’ यांचे वयाच्या ७७ वर्षी निधन झाले आहे. त्यांच मुळ नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असे होते. पण, गद्दार म्हणून त्यांनी सर्वदूर आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्यावर हैदराबादमधील एका रूग्णालयात उपचार सुरू होते, जिथे त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, १९८० च्या कालखंडात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सदस्य झालेले गद्दार हे संघटनेची शाखा असलेल्या जननाट्य मंडळी या संस्थेचे संस्थापक होते. तेलंगणा राज्याच्या चळवळीत गद्दार यांनी वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मुद्द्यास पाठिंबा दिला आणि १०१७ पासून माओवाद्यांसोबतचे संबंध तोडले. खरं तर २०१० पासून माओवादी म्हणून ते सक्रिय नव्हते. लक्षणीय बाब म्हणजे २०१८ च्या निवडणुकीत गद्दार यांनी प्रथमच मतदान केले. मतदान करणे हे निरर्थक कृत्य असे मानणाऱ्या गद्दार यांनी तेव्हा प्रथमच मतदानाचा हक्क बजावला.

मागील महिन्यात त्यांनी एक राजकीय पक्ष सुरू करणार असल्याचे जाहीर केले, त्याला त्यांनी गद्दार प्रजा पार्टी असे संबोधले. तसेच आगामी निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. त्यांनी यापूर्वी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. १९९७ मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली होती आणि ते या हल्ल्यातून सुदैवाने वाचले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -