Wednesday, April 23, 2025
Homeदेशमहाराष्ट्रातील तब्बल इतक्या स्थानकांचं रुपडं पालटणार, नव्या योजनेला सुरुवात

महाराष्ट्रातील तब्बल इतक्या स्थानकांचं रुपडं पालटणार, नव्या योजनेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): महाराष्ट्रातील स्थानकं ४४ स्थानकं ही नव्या स्वरुपात आणि नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते अमृत भारत स्थानक (Amruta Bharat Station Scheme) योजनेचा शुभारंभ झाला. या उपक्रमातंर्गत देशातील ५०८ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या स्थानकांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील ४४ स्थानकांसाठी १६९६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील पाच विभागातील स्थानकांचा समावेश

महाराष्ट्रातील एकूण पाच विभागातील स्थानकांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक छोट्या आणि मोठ्या स्थानकांचं रुपडं आता पालटणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. या पाच विभागांमध्ये खालील स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई विभाग – भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड

पुणे विभाग – कोल्हापूर, हडपसर, चिंचवड, सातारा, सांगली, कराड, तळेगाव, हातकणंगले, आकुर्डी, बारामती, देहूरोड, केडगाव, उरुळी, लोणंद, वाठार, फलटण, नागपूर विभाग – बल्हारशाह, बैतूल, चंद्रपूर, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, अमला, नरखेल, काटोल, पांढुर्णा, जुन्नरदेव, हिंगणघाट, मुलताई, घोराडोंगरी, गोधनी

भुसावळ विभाग – बडनेरा, मलकापूर, मूर्तिजापूर, नेपानगर, शेगाव, देवळाली, मनमाड, नांदुरा, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा

सोलापूर विभाग – सोलापूर, कलबुर्गी, दौंड, पंढरपूर, वाडी, कुर्डुवाडी, अहमदनगर, कोपरगाव, लातूर, शहाबाद, बेलापूर, गंगापूर रोड, दुधनी, उस्मानाबाद, जेऊर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -