Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीAmit Shah Pune visit : देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा...

Amit Shah Pune visit : देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा ४२ टक्के

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्राबाबत गौरवोद्गार

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) काल संध्याकाळी पुण्यात दाखल झाले. आज पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ पोर्टलचे (Sahkar se Samruddhi Portal) उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेत्यांची उपस्थिती होती.

यावेळी संबोधित करताना अमित शाह म्हणाले, ‘गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान मोदींनी लोकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. ६० वर्षांपासून लोकांची जी स्वप्न होती, ती मोदींनी पूर्ण केली. आज आपण पाहिलं तर देश एका बाजूला अन् महाराष्ट्र राज्य एका बाजूला आहे. कारण, देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा ४२ टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आल्याचं शहा म्हणाले. यावेळी त्यांनी मी पहिल्यांदाच अजित पवारांसोबत एका मंचावर आहे. मोठ्या कालावधीनंतर अजितदादा तुम्ही आता योग्य जागेवर बसलात, तुम्ही आधीच या जागेवर यायला हवं होतं, असंही मिश्किलपणे म्हटलं.

कुणीही आपल्या पुतण्या-भावाला नोकरीला लावू शकणार नाही

पुढे अमित शाह म्हणाले की, मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ॲक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सहकार विभागाचे सचिव आणि त्यांच्या टीमने अत्यंत कमी वेळेमध्ये हा कायदा आमलात आणण्यासाठी कष्ट घेतले. २ तारखेला कायदा तयार झाला आणि ४ तारखेला लागू झाला. मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह ॲक्टअंतर्गत निवडणूक व्यवस्थेमध्ये सुधार, को-ऑपरेटिव्ह गव्हर्नन्स, व्यापारी सुलभता आणि स्वतंत्र निवडणूक आयोग नेमण्यात आलेला आहे. आता कुणीही आपल्या पुतण्या-भावाला नोकरीला लावू शकणार नाही. बोर्ड चालवण्याच्या नियमांत मोठे बदल केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ज्यांच्याकडे टॅलेंट ते आमच्यासोबत

जो येणार तो आमचाच आहे. ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. सहकाराला गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सहकाराच्या ऑडिटची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलीय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनात सहकाराला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम करणार आहोत, असा विश्वास यावेळी अमित शाह यांनी बोलून दाखवला.

राज्यातील सत्ताधार्‍यांकडून अमित शहांचं कौतुक

दरम्यान, राज्यातील सत्ताधार्‍यांनी अमित शहा यांचं आजच्या कार्यक्रमात भरभरुन कौतुक केलं. ‘अमितभाई हे महाराष्ट्राचे जावई आहेत’ असं अजित पवार म्हणाले, तर ‘अमित शहांकडून सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले आहेत. त्यांनी एकदा निश्चय केला की, ते थांबत नाहीत’ अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी प्रशंसा केली. अमित शहांकडून सहकारात मोठे बदल झाले आहेत. अमित शहांना महाराष्ट्र खूप चांगला कळतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -